Sunday, May 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकरोड ते हिंगणवेढा सिटीलिंक बससेवा काही कालावधीसाठी स्थगित

नाशिकरोड ते हिंगणवेढा सिटीलिंक बससेवा काही कालावधीसाठी स्थगित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सिटीलिंकच्या वतीने नाशिक शहर तसेच शहर हद्दीपासून 20 किमी अंतरापर्यंत बससेवा पुरविण्यात येते. यातीलच मार्ग क्रमांक 256 नाशिकरोड ते हिंगणवेढामार्गे सामनगाव, कोटमगाव या मार्गावरील बससेवा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सध्या चाडेगाव याठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्याने येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे पुढे मार्गस्थ होण्यासाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध नसल्याने मार्ग क्रमांक 256 नाशिकरोड ते हिंगणवेढा मार्गे सामनगाव, कोटमगाव या मार्गावरील बससेवा ही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे.

या मार्गावर प्रवास करणार्‍या ज्या प्रवाश्यांनी पास काढलेले आहेत अश्या प्रवाश्यांना न वापरलेल्या दिवसांच्या पासचे पैसे सिटीलिंक कार्यालयाकडून परत करण्यात येतील. त्यांनी सिटीलिंक कार्यालयाशी संपर्क साधून पास संदर्भातील माहितीसह रीतसर आपला अर्ज कार्यालयाकडे जमा करावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कोट्यवधी रुपये खर्चूनही गटारीचे पाणी गोदावरीत

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik नाशिक महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी मिशनच्या लाखो रुपयांच्या कामांनंतरही गोदावरी नदीत गटारीचे सांडपाणी मिसळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपासून...