Monday, May 27, 2024
HomeनाशिकNashik Police News : नाशिक ग्रामीण पोलीस राज्यात सलग दुसर्‍यांदा अव्वल

Nashik Police News : नाशिक ग्रामीण पोलीस राज्यात सलग दुसर्‍यांदा अव्वल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलीस स्टेशनला (Police Station) दाखल होणारे सर्व गुन्हे, आरोपी यासह सर्व पोलिस कामकाजाची माहिती संगणकीय यंत्रणेत भरून ती जतन करण्यासाठी सन २०१५ पासून सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स्) ही यंत्रणा देश पातळीवर सुरू करण्यात आली आहे…

- Advertisement -

Ajit Pawar : भाजप पाठिंब्यावर अजित पवार मुख्यमंत्री?

राज्यभरातील पोलीस घटकांकडून चालणारे सीसीटीएनएस कामकाजाचे (CCTNS Functioning) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (State Crime Investigation Department) दरमहा परीक्षण केले जाते. जुलै २०२३ या महिन्याच्या मूल्यमापनात नाशिक ग्रामीण घटक प्रथम क्रमांकावर आला होता. नुकतेच ऑगस्ट २०२३ चे मूल्यमापन जाहीर झाले असून यातही नाशिक ग्रामीण घटकास अव्वल स्थान मिळाले आहे. याप्रमाणे नाशिक ग्रामीण (Nashik Rural) घटकाने सीसीटीएनएस मधील मूल्यांकनात प्रथम येण्याचा मान सलग दुसर्‍यांदा मिळविला आहे.

Nashik News : कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील ८५ गुन्हेगारांची तपासणी

दरम्यान, जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या (District Police Headquarters) ठिकाणी सीसीटीएनएस शाखा कार्यरत असून या शाखेत काम करणार्‍या महिला अंमलदार सिमा उगलमुगले, ज्योती आहिरे, प्रतिभा शिंदे व कविता भोर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांनी सत्कार केला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसला नाशकात ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा; शहराला कायम अध्यक्ष नसल्याने नाराजी

- Advertisment -

ताज्या बातम्या