Saturday, October 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली

डॉ. धोंडोपंत स्वामी नवनियुक्त पोलिस अधीक्षक

- Advertisement -

​नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्य गृह विभागाने गुरुवारी (दि. ३०) भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या फेरबदलात ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. धोंडोपंत स्वामी यांची नाशिक ग्रामीणच्या नवनियुक्त पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

​नाशिकचे मावळते पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांच्या जागी डॉ. स्वामी नाशिकची धुरा सांभाळतील

मालेगावचे अपर अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची पदोन्नतीने जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून संधू यांच्या जागी आता सूरज गुंजाळ हे मालेगावचे नवे अपर पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.

ताज्या बातम्या

Abhijeet Dipke : दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर CJP च्या आंदोलनाचे नेतृत्व...

0
मुंबई | Mumbai कॉकरोच जनता पार्टीकडून आज (दि.१० ऑक्टोबर) रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र,...