Thursday, October 1, 2026
HomeनाशिकNashik News : सीए परीक्षेत नाशिकची साक्षी जैन देशात पहिली

Nashik News : सीए परीक्षेत नाशिकची साक्षी जैन देशात पहिली

नाशिक | Nashik

आयसीएआयतर्फे घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेचा (CA Foundation Exam) निकाल जाहीर झाला असून, नाशिकच्या (Nashik) साक्षी जैनने ४०० पैकी ३७१ गुण (९२.७५%) मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. नाशिकच्या शैक्षणिक इतिहासातील हे सुवर्णयश आहे.

- Advertisement -

शहरातून उत्कर्ष वाणी (३४३ गुण) दुसरा, तर अनन्या माहेश्वरी (३४० गुण) तिसरी आली. नाशिक केंद्रातून (Nashik Centre) ९८७ पैकी ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, येथील निकाल मुंबई-पुण्याच्या तुलनेत अधिक लागला आहे.

दरम्यान, मुलींचा (Girls) उत्तीर्ण होण्याचा टक्काही वाढला आहे. आयसीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए अभिजित मोदी (Abhijeet Modi) यांच्यासह मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे (Student) कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : ​मान खाली, तोंडावर मास्क! खरातची गुर्मी उतरली; ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik दैवी शक्ती, भविष्याची भिती आणि मंत्र-तंत्राचा धाक दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करुन नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक (Fraud) करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ...