Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याManikrao Kokate : "...तर जनतेचा पैसा खर्च होईल"; मंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना...

Manikrao Kokate : “…तर जनतेचा पैसा खर्च होईल”; मंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना न्यायालयाचे निरीक्षण

नाशिक | Nashik

महायुती सरकारमधील (Mahayuti Government) राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. यामुळे कोकाटे यांच्या आमदारकीवरील टांगली तलवार दूर झाली आहे. मात्र न्यायालयाने निर्णय देताना केलेल्या निरीक्षणाची चांगलीच चर्चा आता राज्यभर होताना दिसत आहे. कोकाटेंना शिक्षा (Punished) दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

- Advertisement -

खोट्या कागदपत्रांच्या आधारे चार घरे लाटण्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) २० फेब्रुवारी रोजी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर १९९५ साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती. याचिका निकाली काढताना न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे त्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, यावेळी बचाव पक्षाकडून मंत्री कोकाटे ३५ वर्षांपासून निवडून येत आहेत. कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांना राज्यभरात काम करण्याची संधी आहे. जर त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर जनतेच्या सेवेची संधी मिळणार नाही. अपील जोपर्यंत सुरू आहे तसेच अंतिम निकाल (Result) येत नाही तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा युक्तिवाद करण्यात आला होता.

न्यायालयाच्या निरीक्षणावर शिवसेना ठाकरे गट आक्रमक

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके (Jayshree Shelke) यांनी मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेच्या निर्णयावर नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, “शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी करणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे दोषी असून त्यांना शिक्षाही झाली आहे. मात्र, त्यांच्या शिक्षेवर स्थगिती न दिल्यास ते आमदारकीतून अपात्र ठरतील आणि त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल आणि हा जनतेचा पैसा खर्च म्हणून परवडणारा नाही, असे न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण अतिशय दुर्दैवी आहे. जर न्यायालयच अशा प्रकारे निरीक्षण नोंदवत असेल तर न्याय कोणाकडे मागावा? राज्य सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींचा एक हप्ता देऊ नये. मात्र, माणिकराव कोकाटे हे पात्र की अपात्र? हे त्यांच्या मतदारसंघातील जनतेला ठरवूच द्या, अशी आक्रमक भूमिका जयश्री शेळके यांनी घेतली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...