नवीन नाशिक | प्रतिनिधी
गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली नाशिक ते शेगाव सायकल वारी 3 जानेवारी २०२१ राेजी भांड न्युज पेपर एजन्सी, डीजीपी नगर क्रं २अंबड नाशिक येथून निघणार असल्याची माहिती एजन्सी चे संचालक प्रल्हाद भांड यांनी दिली….
ही शेगाव सायकल वारी ६ जानेवारी रोजी संत नगरी शेगाव येथे पोहोचणार आहे. भांड यांनी सुरू केलेली ही सायकलवारी आता वटवृक्ष होऊ पाहत आहे. सन २००० मध्ये सुरू झालेली ही सायकल वारी अखंडितपणे सुरू असून यंदाच्या सायकल वारीचे हे २१वे वर्ष आहे.
भक्ती -शक्ती बरोबरच पर्यावरण संवर्धनाचा जागर करत व्यसनमुक्ती संदेश देत पेट्रोल बचतीचा मंत्र तसेच सायकल चालविण्याचे आरोग्याला किती महत्वाचे आहे हा संदेश देत ही सायकल रॅली ४६० किलोमीटरचे अंतर रोज११० किमी प्रमाणे चालवत चौथ्या दिवशी संतनगरी शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचते.
यावेळी सायकल वारी चे संयोजक भांड यांनी सांगितले की नाशिक ,मालेगाव, पारोळा, मुक्ताईनगर, शेगाव. गण गण गणात बोते चा गजर करत दर्शन घेऊन परतीचा प्रवास रेल्वेनी करतात.
आतापर्यंत वीस वर्षात विना अपघात सायकलवारी पार पडली आहे. सुरुवातीला ते केवळ एकटेच सायकल वारी शेगावला जात असत आता ३५ वारकऱ्यांचा समूह घेऊन जात आहेत. सर्व शासकिय नियमांच पालन करत वारी शेगावात पोहोचणार आहे अत्यंत शिस्तबद्ध असणारी ही सायकल वारी भक्तीला विज्ञानाची जोड देत अखंड चालू आहे यात आता तरुणांची संख्या देखील वाढत आहे.
यावेळी प्रथम भांड यांनी संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले व बैठकीला सुरुवात केली. यावेळी संत गजानन महाराज भक्त मंडळातील सायकल वारीला येणाऱ्या सदस्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी संजय जाधव, दिलीप देवांग, नारायण सुतार, शरद सरनाईक, अरुण शिंदे, अनिल भवर, आबा जाधव, अनिल भावसार, सिताराम भांड, अविनाश दातीर, मुकेश कानडे, सुधाकर सोनवणे, राजेंद्र भांड, भूषण सहाने, राहुल ऊकाडे, पांडुरंग पाटील, राकेश धामणे, संजय सुदाम जाधव, राजेंद्र खानकरी, अनिल भवर, सुनील चौधरी, राजेंद्र काळे आदी सायकल वारकरी ऊपस्थित हाेते.