Wednesday, October 14, 2026
HomeनाशिकNashik Sinhastha Kumbhamela: २५ ला शंखनाद, ३० ऑक्टोबरपासून धार्मिक सोहळा, ३१ला ध्वजारोहणाने...

Nashik Sinhastha Kumbhamela: २५ ला शंखनाद, ३० ऑक्टोबरपासून धार्मिक सोहळा, ३१ला ध्वजारोहणाने होणार सिंहस्थाचा प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची तयारी आता वेगाने सुरू झाली असून, धार्मिक कार्यक्रमांसोबतच स्वच्छता, घाटविकास, वाहतूक आणि भाविकांच्या सुविधांवर प्रशासनाने विशेष भर दिला आहे. दि. २५ ऑक्टोबरला शंखनाद, ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय धार्मिक सोहळा आणि ३१ ऑक्टोबरला मुख्य ध्वजारोहण होणार आहे. या सर्व कार्यक्रमांच्या नियोजनासाठी कुंभमेळा प्राधिकरण, महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस, आखाडे आणि धार्मिक संस्थांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सोमवारी (दि.१२) पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, महंत भक्तीचरणदास महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ला, चंद्रशेखर पंचाक्षरी उपस्थित होते. ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत गर्दी नियंत्रण, भाविकांची सुरक्षितता, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग आणि धार्मिक संस्थांच्या आवश्यकतांचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमांची अंतिम रूपरेषा संबंधित विभागांशी चर्चा करून निश्चित करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.

- Advertisement -

शंखनादाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार
ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून २५ ऑक्टोबरला नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे शंखनाद करण्यात येणार आहे. या शंखनादाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असून, त्याचे प्रमाणपत्र ध्वजारोहण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय सिंहस्थावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण, कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण आणि कॉफीटेबल बुकचे प्रकाशन होणार आहे. सायंकाळी गोदावरी आरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.

Nashik TCS Case: वर्ग खटल्याची न्यायालयात सुनावणी; ९ पैकी ६ खटल्यांमध्ये दोषनिश्चितीपूर्वीचा युक्तिवाद सुरू

३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर धार्मिक सोहळ्याचे आयोजन
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर श्री गंगा गोदाबरी पंचकोटी तीर्थ पुरोहित संघ आणि सिंहस्थ समितीच्या वतीने ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ३० ऑक्टोबरला संकल्प, तीर्थपूजन, गणेशपूजन, नवग्रह व रुद्र स्थापना, स्वर्णपाद विधी, स्वजविधी आणि गोदावरी प्रार्थना होईल. ३१ ऑक्टोबरला मुख्य ध्वजारोहण, गोदावरी आरती, प्रतिज्ञापालन आणि सायंसंध्यापूजन होणार आहे. १ नोव्हेंबरला उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहुती आणि अवभूत स्नानाने सोहळ्याची सांगता होईल.

रामकुंड परिसरासह गोदावरी नदीच्या घाटांवर स्वच्छता, सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांची कामे
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. रामकुंड परिसरासह गोदावरी नदीच्या घाटांवर स्वच्छता, सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू परिसरातील आहे. स्वच्छतेबरोबर बांधकामांचा राडारोडा व अनावश्यक साहित्य हटविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. गोदाघाट परिसरातील फरसबंदी, काँक्रीटीकरण आणि अन्य
आवश्यक कामे नियोजनानुसार पूर्ण केली जाणार असून, भाविकांसाठी शौचालयांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर आहे. त्यामुळे घाट परीसर काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ मेळ्याचा ध्वजारोहण सोहळा हा सर्व नाशिककरांचा सोहळा आहे. या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. दरम्यान, तयारीच्या काळात काही कामांमुळे नागरिकांना तात्पुरता त्रास होण्याची शक्यता असून, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Drought News : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यांचा दुष्काळी यादीत...

0
नाशिक | Nashik पाऊस वेळे आधीच माघारी परतल्याने राज्यात दुष्काळाची (Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ...