Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकNashik Sinnar News : ब्रेक फेल झाल्याने बस चढली फलटावर; बालकाचा मृत्यू,...

Nashik Sinnar News : ब्रेक फेल झाल्याने बस चढली फलटावर; बालकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

सिन्नर आगारातून (Sinnar Bus Depo) देवपूरलासाठी निघणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट फलटावर चढल्याची घटना आज (दि.१९) रोजी सकाळी १०.४५ वाजता घडली. या घटनेत तालुक्यातील दापूर (Dapur) येथील नऊ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर मुलाची आई व इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, बस क्रमांक एमएच १३ सीयू ८२६७ ही बस देवपूरसाठी सकाळी ११ वाजता सुटणार होती. १०.४५ वाजता चालक आगारातून बस फलटावर लावण्यासाठी आणत असताना अचानक त्याला बसचे ब्रेक झाल्याचे लक्षात आले. यामुळे बसवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने बस (Bus) थेट फलटावर चढली. यावेळी फलटावर गौरी योगेश बोऱ्हाडे (३०) त्यांचा ९ वर्षीय मुलगा आदर्श योगेश बोऱ्हाडे, विठाबाई ज्ञानेश्वर भालेराव, ज्ञानेश्वर रामकृष्ण भालेराव रा. तामकटवाडी यांच्यासह काही प्रवासी उभे होते.

दरम्यान, बसची जोरदार धडक बसल्याने आदर्शचा मृत्यू झाला. तर आई गौरी, विठाबाई, ज्ञानेश्वर हे गंभीर जखमी झाले. यानंतर जखमींना तात्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रस्त्यातच आदर्शचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी (Police) घटनास्थळी येत बस चालकास ताब्यात घेतले. तर नातेवाईकांकडून चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून, या घटनेविरोधात भाजपाचे उदय सांगळे व कार्यकर्त्यांकडून पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. घटनेत बालकाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikनाशिकमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (िद.१०) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर महायुतीचे...