भालाफेक,वेटलिफ्टिंग गोळाफेक आणि १०० मी धावणे क्रीडाप्रकारात यशस्वी
नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे महाराष्ट्र स्टेट ई-२ झोनल भालाफेक, गोळाफेक आणि १००मी धावणे या नुकत्याच नाशिकमध्ये पार पडल्या.
यावेळी श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर पॉलीटेक्निकमध्ये तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विशाल जाधव या विद्यार्थ्याने भालाफेक प्रकारात प्रथम क्रमांक, वेटलिफ्टिंग प्रकारात प्रथम क्रमांक तर गोळाफेक आणि १०० मी धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
हेही वाचा : रणजीत नाशिकचा सत्यजित बच्छाव चमकला
विशाल जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी देवून त्याचा सन्मान करण्यात आला. मागील आठवड्यात विशाल जाधव याने वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त केला होता.
तद्नंतर कालच झालेल्या या तीन क्रीडा प्रकारात त्याला पुन्हा यश मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याच्या यशाबद्ल महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीश संघवी, व्यवस्थापकीय विश्वस्त राहुल संघवी, सोसायटीच्या समन्वयक तथा डीन डॉ. प्रियंका झवर, महावीर पॉलीटेक्निकचे प्राचार्य संभाजी सगरे, प्रा. संतोष वाबळे ,जगदीश कोल्हे , प्रा .पूजा भालेराव, प्रा. वर्षा गाढे, प्रा. नंदिनी खुटाडे तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदींनी यावेळी त्याचे कौतुक केले आहे. त्यांना क्रीडा समन्वयक प्रा. नेहा जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.