Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik Suicide News : कर्जाचा जाच अन् वसुली एजंटचा मानसिक त्रास; ...

Nashik Suicide News : कर्जाचा जाच अन् वसुली एजंटचा मानसिक त्रास; ट्रॅव्हलचालकाची छळवणुकीला कंटाळून आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वाहन कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली एजंट आणि गुंडांकडून होणाऱ्या मानसिक छळवणुकीला कंटाळून एका तरूणाने (Youth) टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. आडगाव हद्दीतील जत्रा हॉटेल परिसरात राहणाऱ्या महेश दादासाहेब शिंदे (२७) या खासगी ट्रॅव्हल्सचालकाने कर्जाऊ कारमध्येच विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना सोमवारी (दि. २९) घडली असून खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

आडगाव पोलिसांच्या (Aadgaon Police) माहितीनुसार, मृत महेश शिंदे हे मूळचे शिंगवे (ता. नांदगाव, मनमाड परिसर) येथील रहिवासी होते. गेल्या आठ वर्षांपासून ते नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरात वास्तव्यास होते आणि ट्रॅव्हल व्यवसाय करत होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून वाहन कर्ज घेतले हो-ते. परंतु, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे संबंधित फायनान्स कंपनीच्या वसुली एजंट आणि गुंडांकडून त्यांचा मानसिक छळ केला जात होता व त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. या सततच्या छळामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या महेश यांनी कारमध्येच विष प्राशन केले. विष प्राशन केल्याचे समजताच त्यांना तातडीने उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले हो ते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात (Hospital Area) वाहनचालक युनियनचे पदाधिकारी व चालक जमा झाले. आडगाव पोलिसांनी या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत महेश यांच्या नातलगांनी फायनान्सच्या गुंडांवर मानसिक छळ आणि गंभीर धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आता सुसाईड नोटचा शोध सुरू केला आहे. तसेच, मृताच्या कुटुंबाचे सविस्तर जबाब, मोबाइलमधील कॉल हिस्ट्री, संशयास्पद संभाषण आणि चॅटिंगचा कसून तपास केला जात आहे. दोषींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी नातेवाईक आणि वाहनचालक युनियनने केली आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...