Monday, October 5, 2026
HomeनाशिकNashik TCS Case : चैनानीसह पाच संशयितांचा कारागृहातील मुक्काम वाढला; आगामी सुनावणी...

Nashik TCS Case : चैनानीसह पाच संशयितांचा कारागृहातील मुक्काम वाढला; आगामी सुनावणी ‘अशा’ होणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील (Nashik TCS Case) लैंगिक शोषण व धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणातील संशयितांनी (Suspected) जामिनासाठी केलेले अर्ज नाशिक न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. यामध्ये कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी हिच्यासह अन्य पाच संशयितांचा समावेश आहे. न्यायालयाने (Court) गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासातील भक्कम पुरावे ग्राह्य धरत या सर्वांना जामीन देण्यास नकार दिला असून, त्यांचा मुक्काम नाशिकरोड कारागृहात वाढला आहे.

- Advertisement -

सर्वच जामिन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने कडक भूमिका घेतली. संशयितांनी केलेले कृत्य हे जाणीवपूर्वक आणि कट रचून केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पीडितांनी न्यायालयासमोर दिलेले जबाब, पोलिसांनी (Police) संकलित केलेले तांत्रिक पुरावे आणि गुन्ह्याचे स्वरूप पाहता, या टप्प्यावर जामीन देणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. लया संपूर्ण प्रकरणात कंपनीची एजीएम अश्विनी चैनानी हिची भूमिका संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या ‘एसआयटी’ तपासात समोर आले आहे.

मुख्य संशयित दानिश शेख याला पोलिसांनी अटक (Arrested) करण्याच्या काही तास आधी अश्विनीने त्याला कॉल केल्याचे समोर आले आहे. विनयभंग झाल्यानंतर पीडितेने तक्रार केली असता, अश्विनीने तिला तुमको क्या हायलाईट होना है? आणि जाने दो, छोड दो असे म्हणत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. लपोलिसांनी कंपनीतील ७८ संशयास्पद ई-मेल आणि कॉल रेकॉर्ड्सचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत, असे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले.

तौसिफ अत्तारसह पाच जणांचे अर्ज फेटाळले

शुक्रवारी (दि. १५) झालेल्या अंतिम सुनावणीत अश्विनी चैनानीसह तौसिफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी आणि शफी शेख यांच्या जामीन अर्जावर निर्णय झाला. या सहाही जणांचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. कंपनीतील विविध प्रकरणांबाबत एकूण ९ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ३ गुन्ह्यांत संशयितांनी अद्याप जामिनासाठी प्रयत्न केलेले नाहीत.

आगामी सुनावणी अशा….

  • २५ मे : बलात्कार आणि धर्मांतर प्रकरणात संशयित निदा खान हिच्या जामीन अर्जावर सुनावणी.
  • ३० मे : संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी.
  • ६ जून : तरुणाच्या धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत दानिश शेखच्या अर्जावर पुढील सुनावणी.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीतून राम शिंदे यांची माघार

0
अहिल्यानगर । प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम...