Thursday, May 14, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : निदा खानच्या अडचणीत वाढ; 'इतक्या' दिवसांची न्यायालयीन कोठडी

Nashik TCS Case : निदा खानच्या अडचणीत वाढ; ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिक | Nashik

टीसीएस कंपनीतील (TCS Company) तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाच्या तपासात मुख्य संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिसांनी (Nashik Police) छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. यानंतर तिची एसआयटीकडून कसून चौकशी करण्यात आली. यानंतर आज (सोमवारी) निदा खानला न्यायालयात हजर करण्यात आले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

निदा खानला नाशिकरोड येथील न्यायालयात (Nashik Road Court) हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता तिची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होणार आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार या दोघांचा ताबाही आता एसआयटी घेणार आहे. निदा, दानिश आणि तौसिफ या तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. यातून या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) या प्रकरणात कट रचणे आणि धार्मिक भावना दुखावण्याबाबतच्या कलमांत वाढ केली आहे. निदा खानकडून जप्त केलेल्या १७१ लिंक्सचा तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी एसआयटीने तिच्या कोठडीत (Custody) वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

निदाला एमआयएमच्या नगरसेवकाने दिला होता आश्रय

२६ मार्चपासून पसार असलेल्या निदाला छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचा नगरसेवक मतीन माजिद पटेल याने आश्रय दिला होता. सुरुवातीला हा फ्लॅट निदाच्या नातेवाईकाचा असल्याचे सांगितले जात होते, मात्र पोलिसांच्या पडताळणीत निदाचा त्या फ्लॅटशी कोणताही संबंध नसल्याचे समोर आले आहे. निदा गर्भवती असतानाही तिला मिळलेला हा आश्रय आणि त्या काळात तिला झालेला अर्थपुरवठा नक्की कोणाकडून झाला, याचा शोध ‘एसआयटी’ आता घेत आहे.

पीडितेची मूळ ओळख पुसून टाकण्याचा निदाने रचला होता कट

देवळाली कॅम्पमधील पीडितेची मूळ ओळख पुसून टाकण्याचा कट निदाने रचला होता. पीडितेचे नामकरण ‘हानिया’ असे केले होते. इतकेच नाही, तर निदा स्वतः पीडितेच्या घरी जाऊन तिला विशिष्ट धर्माचे शिक्षण देणे, धार्मिक पेहराव परिधान करण्यास भाग पाडणे आणि विशिष्ट प्रार्थनांची सक्ती करणे, अशा कृती करत होती. पीडितेला पूर्णतः प्रभावाखाली घेण्यासाठी निदाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ताज्या बातम्या