Friday, May 15, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : निदा खानच्या नातेवाईकांचीही SIT कडून चाैकशी केली जाणार

Nashik TCS Case : निदा खानच्या नातेवाईकांचीही SIT कडून चाैकशी केली जाणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

टीसीएस कंपनीतील (TCS Company) पीडितेवर झालेला अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटकेत (Arrested) असलेली संशयित निदा एजाज खान (Nida Khan) हिच्या पोलिस कोठडीत नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, आता निदाची आई, मावशी आणि इतर जवळच्या नातेवाईकांचीही एसआयटीमार्फत (SIT) सखोल चौकशी केली जाणार आहे.

- Advertisement -

​२६ मार्चपासून पोलिसांना (Police) गुंगारा देणारी निदा खान नाशिकरोड न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांच्या जाळ्यात अडकली. तिला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ती पसार असताना तिला छत्रपती संभाजीनगरमधील ‘एमआयएम’चा नगरसेवक मतीन माजिद पटेल याने आश्रय दिला होता. पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मतीनवर दबाव टाकल्यानंतर निदाचा पत्ता लागला. या प्रकरणी मतीनवरही गुन्हा दाखल झाला असून, आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत.

निदा खानविरोधात नाशिकमधील देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी तिच्यावर कट रचून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला असून, संबंधित कलमांची वाढ केली आहे. या संपूर्ण प्रकरणात निदाच नव्हे, तर संशयित दानिश शेख, ​तौसिफ अत्तार, ​शाहरूख शेख, ​रझा मेमन यांचा सहभाग समाेर आला आहे. 

ताज्या बातम्या

साखर

साखर निर्यातबंदीचा निर्णय चिंताजनक, खासदार भगरेंकडून निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी

0
पिंपळगाव ब. | प्रतिनिधीकेंद्र सरकारने कच्ची, पांढरी आणि शुद्ध साखरेच्या निर्यातीवर सप्टेंबर २०२६ पर्यंत तत्काळ प्रभावाने बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय हा ऊस उत्पादक शेतकरी,...