Monday, August 17, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : एमआयएम नगरसेवक पटेल तुरुंगात; निदा खानला आश्रय दिल्याच्या...

Nashik TCS Case : एमआयएम नगरसेवक पटेल तुरुंगात; निदा खानला आश्रय दिल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन काेठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

टीसीएस कंपनीतील (TCS Company) तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील संशयित निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याला अटकेनंतर नाशिकरोड न्यायालयाने (Nashik Road Court) न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली आहे. गुरुवारी(दि.६) संभाजीनगरातून अटक केल्यानंतर शुक्रवारी (दि. ७) सकाळी त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. न्यायालयाने त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले असून, मतीनच्या (Matin Patel) वकिलांनी त्याच्या जामिनासाठी धावाधाव सुरू केली आहे.

- Advertisement -

नाशिक शहर गुन्हे शाखेच्या (Nashik City Crime Branch) विशेष तपास पथकाने गुरुवारी (दि. ६) दुपारी संभाजीनगरात दोन तास चौकशी करून मतीन पटेलला ताब्यात घेतले होते. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २६ मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान (Nida Khan) पसार झाली होती. २ मे रोजी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मतीन पटेलने दिलेल्या आश्रयातून संभाजीनगरातील नायगाव येथील एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. ७ मे रोजी पोलिसांनी निदाला अटक केली हाेती.

त्यानंतर मे महिन्यात मतीनची आठ तास चौकशी करून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. जप्त मोबाईलमधील (Mobile) मतीन पटेल आणि फ्लॅट मालक सहसंशयित हनिफ यांच्यातील कॉल रेकॉर्डिंगवरून मतीननेच निदाला सुरक्षित आश्रय दिल्याचे उघडकीस आले हाेते. या प्रकरणातील (Case) एकूण आठ संशयितांपैकी पाच जणांना जामीन मिळाला असून, मुख्य संशयित दानिश शेखसह तिघांचा जामीन फेटाळला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहुरीतील देवळालीत तिरंगा रॅली दरम्यान...