Monday, August 17, 2026
HomeनाशिकNashik TCS Case : मुख्य संशयित तुरुंगातच; आठ गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल

Nashik TCS Case : मुख्य संशयित तुरुंगातच; आठ गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘टीसीएस’ कंपनीतील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावून धर्मांतराचा प्रयत्न करणे आणि सहकाऱ्यांवर अत्याचार व विनयभंग केल्याच्या प्रकरणातील सर्वच गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाने पूर्ण केला आहे. तसेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामुळे या खटल्याच्या नियमित न्यायालयीन (Court) सुनावणीचा मार्ग मोकळा झाला असून विविध नऊ गुन्ह्यांत अडकलेल्या आठ प्रमुख संशयितांपैकी ५ जणांना जामीन मंजूर झाला असून, मुख्य संशयित दानिश शेखसह तिघांचा जामीन फेटाळल्याने (Rejection of bail) त्यांचा कारागृहातील मुक्काम कायम आहे.

- Advertisement -

मार्च २०२४ मध्ये प्रकरण उघडकीस आले होते. कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्याविरोधात प्रेमाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची व धर्मांतरासाठी दबाव आणल्याची तक्रार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या घटनेनंतर इतर पीडित कर्मचाऱ्यांनीही धीर धापून पुढे येत मुंबईनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. धार्मिक भावना दुखावणे आणि विनयभंगाचे ८ स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले होते. यानंतर, गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. नऊ गुन्ह्यांच्या तपासात संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा शेख, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, अश्विनी चैनानी, शफी शेख आणि असिफ अन्सारी या संशयितांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली हाेती.

संशयित निदा खान हिला पसार असताना आश्रय दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) आणि घरमालक हानिफ शेख यांनाही देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात सहसंशयित करण्यात आले. तपासाचा टप्पा पूर्ण करत ‘एसआयटी’ने न्यायालयात भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात संशयितांविरोधात एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याने प्रत्येक गुन्ह्यात जामीन मिळवणे बंधनकारक होते. नगरसेवक मतीन पटेल आणि हानिफ शेख वगळता सर्व मुख्य संशयितांना अटक करण्यात आली होती. आता दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे न्यायालयात या प्रकरणाची नियमित सुनावणी (Hearing) सुरू झाली आहे.

सुनावणीअंती जामिनाची स्थिती

संशयिताचे नाव एकूण गुन्हे जामिनाची सद्यस्थिती
दानिश शेख २ अत्याचाराच्या गुन्ह्यात जामीन फेटाळला-तुरुंगात
तौसिफ अत्तार ६ ५ गुन्ह्यांत जामीन, एक अर्ज फेटाळला
रझा मेमन ५ ४ गुन्ह्यांत जामीन, एका अर्ज फेटाळला
शाहरुख कुरेशी ४ ३ गुन्ह्यांत जामीन, एक अर्ज फेटाळला
अश्विनी चैनानी १ जामीन मंजूर (कारागृहाबाहेर)
निदा खान २ जामीन मंजूर(कारागृहाबाहेर)
असिफ अन्सारी २ जामीन मंजूर(कारागृहाबाहेर)
शफी शेख ४ सर्व गुन्ह्यांत जामीन(कारागृहाबाहेर)

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहुरीतील देवळालीत तिरंगा रॅली दरम्यान...