नाशिक | प्रतिनिधी | Nashik
टाटा कन्सल्टन्सी धर्मांतराचा सर्व्हिसेसमधील प्रयत्न आणि अत्याचार प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणातील (Nashik TCS Case) मुख्य संशयित निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने जे खुलासे केले, त्याामुळे संपूर्ण यंत्रणा चक्रावून गेली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे आता थेट मालेगावपर्यंत पोहोचली असून, एका रहस्यमयी ‘मालेगाव पार्टी’चा उल्लेख समोर आला आहे.
न्यायालयात (Court) सादर झालेल्या पुराव्यांनुसार, केवळ धर्मांतर करणे हाच संशयितांचा उद्देश नव्हता, तर पीडित तरुणीची मूळ ओळख पूर्णपणे पुसून टाकण्याचा कट होता, असा युक्तिवाद न्यायाधीश केदार जोशी यांच्यासमोर करण्यात आला. संशयित दानिश शेख याने ओळख वाढताच पीडितेची (फिर्यादी) शैक्षणिक आणि महत्त्वाची कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली होती. ही कागदपत्रे वापरून पीडितेचे नाव आणि आडनाव बदलण्यासाठी ‘मालेगाव येथील एका पार्टी’ची मदत घेतली जाणार होती. ही ‘मालेगाव पार्टी’ नेमकी काय आहे? ते कागदपत्रांमध्ये फेरफार करणारे रॅकेट आहे की एखादी संघटना ? याचा शोध आता एसआयटीने मनावर घेतला आहे.
इस्लामिक ॲप्लिकेशन?
निदा खान (Nida Khan) ही केवळ संशयित नसून संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार आहे, असे विशेष सरकारी वकिल अॅड. अजय मिसर यांनी न्यायालयात स्पष्ट केले. शिवाय, निदाने पीडितेच्या मोबाईलमध्ये इस्लामिक ॲप्लिकेशन्स डाऊनलोड करून दिले होते. तसेच यूट्यूब लिंक्स, इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून सतत धार्मिक शिकवण देऊन तिचे ब्रेनवॉशिंग केल्याचे त्यांनी युक्तिवादादरम्यान सांगितले. तर, निदा पीडितेस नमाज पठण, हिजाब आणि बुरखा परिधान करण्याचे प्रशिक्षण देत होती. निदाने पीडितेला दिलेला बुरखा आणि धार्मिक पुस्तके पोलिसांनी जप्त केली आहेत, असे सांगितले.
‘इम्रान’ नावाचे गूढ
या प्रकरणाची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची शक्यता आहे. संशयित दानिश शेख आणि तौसिफ हे पीडितेला मलेशिया येथे नोकरीसाठी पाठवण्याच्या तयारीत होते. तिथे तिला मइम्रानफनावाच्या व्यक्तीकडे सोपवण्यात येणार होते. ही व्यक्ती कोण आहे आणि या रॅकेटमध्ये तिची भूमिका काय, याचा तपास आता सुरु झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून सात महिला आणि एका पुरुषाने पुढे येत तक्रारी दिल्या आहेत. ममालेगाव पार्टीफ्चे नाव समोर आल्याने आता तपासाची दिशा बदलली आहे.
दृष्टिक्षेपात
- ‘मालेगाव पार्टी’ आर्थिक रसद पुरवत होती का?
- कागदपत्रे बदलण्यासाठी मालेगावात कोणते नेटवर्क सक्रिय आहे?
- अजून किती तरुणी या जाळ्यात अडकल्या आहेत ?
- मालेगाव पार्टीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम




