नाशिक । Nashik
प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. विभागातील ९० केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडत आहे. एकूण ६९ हजार ३६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
- Advertisement -
दरम्यान ११ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत दोन तासात २३. १६ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक २६.६५ टक्के इतके मतदान धुळे जिल्ह्यात झाले आहे. नाशिक जिल्ह्यात २५.२२ टक्के, नगर जिल्ह्यात १९.९१ टक्के, जळगावला २०.५ टक्के, नंदुरबारला २६.३५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.