Saturday, July 27, 2024
HomeनाशिकVideo : नाशकात पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांवर पाणीच पाणी

Video : नाशकात पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांवर पाणीच पाणी

नाशिक | Nashik

जिल्ह्यासह शहरात गेल्या महिनाभर विश्रांती घेतलेला पाऊस गुरुवार पहाटेपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारी पावसाने शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर शुक्रवारी ही सकाळपासून वरुणराजा बरसत आहे. दोन दिवसापासून सतत कोसळणार्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे तसेच अनेक दिवसांनी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले असून, दमट उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

नाशिकसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस बरसत आहे. शहरात गेल्या महिनाभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने गुरुवारपासून जोरदार हजेरी लावल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. मात्र कालपासून सुरु झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यावर पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी चारचाकी चालवताना चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळत आहे.

नाशिकरोड परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

रस्त्यावर अधीपासून पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचल्याने दुचाकीचालकांना खड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी खड्यात आदळून किरकोळ अपघात झाल्याचे बघायला मिळाले. नाशिक शहरातील नवीन नाशिक, सिडको, पवन नवर, उत्तमनगर, इंदिरानगर, पंचवटी, जुने नाशिक, नाशिकरोड परिसरात पावसाच्या आगमनाने तारांबळ उडालेली बघायला मिळाली. दुचाकीस्वरांनी मिळेल त्या ठिकाणी आडोशाला थांबून पावसापासून बचाव केला तर अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांनी मेन रोड परिसरात आपली दुकाने उचलून सुरक्षित स्थळी हलविली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या