Wednesday, June 26, 2024
HomeनाशिकVideo : नाशकात गणरायाचे जल्लोषात स्वागत

Video : नाशकात गणरायाचे जल्लोषात स्वागत

नाशिक | Nashik

- Advertisement -

आज राज्यभरात गणपती बाप्पाचे (Ganapati Bappa) आगमन होत असून सगळीकडे गणेशभक्त घरोघरी ढोलताशा आणि गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोरया मोरयाच्या गजरात जल्लोषात स्वागत करत आहेत. त्यामुळे राज्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात (Nashik City) देखील गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असून सर्वत्र ढोल ताशांचा गजर ऐकायला मिळाला…

PM Narendra Modi Speech : जुन्या संसदेचं नवं नामकरण! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुचवलं ‘हे’ नाव

गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरातील बाजारपेठ गणपतीची खरेदी करण्यापासून ते सजावटीचे साहित्य विकत घेण्यापर्यंत गर्दीने (Crowd) फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यानंतर आज सकाळपासून घरोघरी गणपती बाप्पाच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील काही छोट्या-मोठ्या मंडळांनी त्यांच्या भव्य गणेश मूर्तींना सोमवारी ढोल ताशांच्या गजरात मंडपात आणले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लेझीमचा नृत्याचा फेर धरत गणरायाचे जोरदार स्वागत केले.

Devendra Fadnavis : अजित पवारांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

तर काही मंडळातील महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडीसह नृत्याचा आनंद लुटत गणपतीचे बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर आज घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच घरोघरच्या गणपती बाप्पाच्या स्वागताबरोबरच शहरातील ऑफिसेस, दुकाने यासह आदी ठिकाणी देखील गणपतीची स्थापना करुन प्रत्येकाने आपापल्या परीने बाप्पाचे जोरदार स्वागत केले. तर काही ठिकाणी ढोलताशे, बँडपथक, ध्वजपथक, सनई-चौघड्याच्या सुरात रथामध्ये किंवा पालखीमध्ये बसवून गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Maharashtra Rain Update : गणरायाच्या आगमनावेळी वरुणराजा लावणार हजेरी; ‘या’ जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार

- Advertisment -

ताज्या बातम्या