Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Trimbakeshwar News : दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी; पालकमंत्री...

Nashik Trimbakeshwar News : दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी; पालकमंत्री गिरीश महाजनांनी केला एसटीने प्रवास

‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

पवित्र श्रावण महिन्यातील (Shravan Monday) दुसऱ्या सोमवारी आज (दि.२४ ऑगस्ट) रोजी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी (Crowd) केली आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

- Advertisement -

पहाटे महापूजा आणि मंदिर खुले

दुसऱ्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे भगवान त्र्यंबकेश्वराची विशेष महापूजा व अभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे.भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेचे विशेष नियोजन केले असून, पूर्व दरवाजा व इतर मार्गांवरून भाविकांना प्रवेश दिला जात आहे.

कडक पोलिस बंदोबस्त

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी (Trafic Jam) टाळण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलीस आणि होमगार्ड यांचा तगडा फौजफाटा आहे. याशिवाय फेरीच्या मार्गावर जागोजागी आरोग्य पथक असून, डॉक्टरांकडून भाविकांची तपासणी केली जात आहे.

विशेष वाहतूक व बस सेवा

नाशिकहून त्र्यंबकेश्वरसाठी (Nashik to Trimbakeshwar) एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेसची सोय केली आहे, ज्यामुळे भाविकांचा प्रवास सुलभ झाला आहे. तर खाजगी वाहनांना तळेगाव फाट्यापर्यंत प्रवेश देण्यात आला असून, तेथून पुढे जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

सेवाभावी संस्थाकडून महाप्रसादाचे वाटप

ब्रम्हगिरी फेरीच्या मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक व धार्मिक संस्थांतर्फे भाविकांसाठी फराळ, पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. दरम्यान दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास दीड लाखाहून अधिक लोक येण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री महाजनांनी केला बसने प्रवास

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज (सोमवार) नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे देखील उपस्थित होते. महाजन यांच्या हस्ते आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथील गंगा गोदावरी द्वार परिसर, मेटघर ग्रामपंचायत, ब्रह्मगिरी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिशन ग्रीन मॉन्सून मोहिमेंतर्गत आज नवव्या टप्प्यात देशी जातीच्या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. आतापर्यंत ५० हजार २७५ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या अभियानासह विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचे सहकार्य लाभत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...