त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
दोन तास त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे मुसळधार पाऊस (Rain) झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. या पावसामुळे त्र्यंबक शहरातील घरे आणि दुकानांत (Home and Shop) पाणी शिरल्याने नागरिकांना चालताना मोठी कसरत करावी लागत आहे.
आज इंदिरा एकादशी असल्याने वारकऱ्यांनी सकाळपासूनच त्र्यंबकला दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे त्यांचे दोन तास जोरदार कोसळलेल्या पावसामुळे चांगलेच हाल केले. तर दुसरीकडे या पावसामुळे (Rain) त्र्यंबक शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
तसेच आजच्या पावसामुळे त्र्यंबकेश्वरच्या डोंगर दर्यांतील धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाल्याचे बघायला मिळाले. बऱ्याच वर्षांनंतर त्र्यंबकला सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस झाल्याने नदी (River) नाल्यांना पूर आला आहे. तर काही घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने किरकोळ प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, या पावसामुळे त्र्यंबकेश्वरला बऱ्याच वेळ रस्त्यावर वाहने (Vehicles) थांबून होती. त्यामुळे रस्त्यांवर साचून राहिले. स्वच्छता नसल्याने पाणी साचण्यात मदत झाली असा आरोप नागरिकांनी त्र्यंबक नगरपरिषदेवर यावेळी केला.




