Tuesday, May 13, 2025
HomeनाशिकNashik Unseasonal Rain : शहरात अवकाळी पावसाची दमदार हजेरी; रस्त्यांवर साचले पाणी

Nashik Unseasonal Rain : शहरात अवकाळी पावसाची दमदार हजेरी; रस्त्यांवर साचले पाणी

नाशिक | Nashik 

- Advertisement -

गेल्या चार ते पाच दिवसांपासुन नाशिक शहरात (Nashik City) अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) कहर सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. काल (सोमवारी) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली होती. त्यानंतर आज (मंगळवारी) देखील पावणे तीन वाजेच्या सुमारास नशिक शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

आज (मंगळवार) अवकाळी पावसाने नाशिक शहरातील (Nashik City) मेनरोड, शालिमार,गोडघाट, सराफ बाजार, द्वारका सीबीएस, सिडको, नाशिकरोड, सातपूर यासह विविध भागांत अवकाळी दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी लपण्यासाठी दुकानांच्या (Shop) गाळ्यांचा आधार घेतल्याचे दिसून आले.

तसेच काल दिवसभरात नाशिक शहरात २१ मिमी पाऊस झाला होता. या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. तर काही ठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. काल (सोमवारी) पहाटे साडेपाचला पाऊस झाला होता. यानंतर वातावरण कोरडे झाले होते. तर दुपारी कडक ऊन पडले होते. मात्र, दुपारच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती.

दरम्यान, काल (सोमवारी) सकाळी साडेअकरा ते अडीचपर्यंत ५.६ मिमी पाऊस झाला होता. अडीच ते साडेपाचपर्यंत पुन्हा १५.४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज (मंगळवारी) दुपारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरणात रोज बदल होत असून, कधी उन्हाचा चटका जाणवतो तर कुठे अवकाळी पावसाचा जोर दिसत आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना (Farmer) बसत आहे.

पुढील १५ ते २० दिवस अवकाळीचे

केरळात मान्सून २३ ते ३१ मेदरम्यान कधीही दाखल होवू शकतो. अंदमान व आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल झालेला मान्सून चांगला कोसळत असून त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार होत आहे. आजपासून पुढील १५ ते २० दिवस म्हणजे ३१ मेपर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनचा नव्हे, परंतु मान्सूनपूर्व वीजा, वारा वावधनासहितचा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यातूनच कदाचित महाराष्ट्रात पेरणीपूर्व शेतीच्या मशागतींना चालना मिळू शकते. शेतकऱ्यांनी त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपूर्व मशागतीस तयारीतच असावे, असे हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी कळविले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Unseasonal Rain : सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; पिकांचे...

0
सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana तालुक्यात मागील सात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या व मुसळधार अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले...