Saturday, July 27, 2024
Homeनाशिकचैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर आढावा बैठक संपन्न

चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर आढावा बैठक संपन्न

सप्तशृंगीगड । वार्ताहर

आगामी काळात येणाऱ्या सप्तशृंगी देवी चैत्रोउत्सव १६ एप्रिल ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत सुरू होणार असल्यामुळे सदर चैत्रोउत्सव सुरळीत पार पडावा म्हणुन विविध विषयावर चर्चा करण्यासाठी चैत्रोउत्सव २०२४ चे नियोजन कायदा व सुव्यवस्था बाबत आज शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यलय येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण उपविभाग यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.

- Advertisement -

या बैठकीत कायदा सुव्यवस्था व भाविकांच्या गर्दीचे नियोजन संभाव्य आपत्कालीन परस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण तसेच आवश्यक ते मदतकार्य प्रक्रिये नियंत्रण तसेच पूर्तता संदर्भित सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक पार पडली. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आपआपली जबाबदारी पार पाडावी अशी सूचना देखील प्रांत अधिकाऱ्याच्या माध्यमातुन देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक, कळवण पोलीस निरीक्षक, अभोणा साहय्यक् पोलिस निरिक्षक , ग्रामीण रुग्णालय कळवण / अभोणा, वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण, उपअभियंता कळवण सा.बा.क्र.१ व ४ , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मालेगाव, व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ कळवण, तालुका पशुवैधकिय अधिकारी पं . स.कळवण, मंडळ अधिकारी नांदुरी. गटविकास अधिकारी कळवण,सहा. अभियंता वीज वितरण कंपनी कळवण,राज्य उत्पादन शुल्क . वणी,व्यवस्थापक सप्तशृंगीगड निवासिनी देवी ट्रस्ट. सप्तशृंगीगड,ग्रामसेवक सप्तशृंगीगड./ नांदुरी, सरपंच सप्तशृंगीगड, नांदुरी, रॉपवे ट्रॉली सप्तशृंगीगड, पत्रकार तसेच सप्तशृंगीगड व्यापारी वर्ग या बैठकीत उपस्थित होते .

- Advertisment -

ताज्या बातम्या