Saturday, August 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Vidhan Parishad Election : "मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री महाजन यांच्याकडून माघारीच्या सूचना...

Nashik Vidhan Parishad Election : “मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री महाजन यांच्याकडून माघारीच्या सूचना नाहीत”; भाजप बंडखोर प्रसाद हिरेंचे विधान

नाशिक | Nashik

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपचे मालेगावचे बंडखोर नेते प्रसाद हिरे (Prasad Hiray) यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत. त्यातच दुसरे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनीही माघार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -

भाजपचे बंडखोर नेते प्रसाद हिरे यांनी थेट भाजपच्या कार्यालयात (BJP Office) जाऊन पक्ष पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना हिरे यांनी, “हा माझा पक्ष आणि हे माझे कार्यालय आहे. मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येथे आलो होतो,” असे सांगत आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

वरिष्ठांकडून माघारीची सूचना नाही

“मला निवडणुकीतून माघार घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) किंवा पक्षातील अन्य कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी अद्याप कोणतीही सूचना दिलेली नाही. मी लवकरच गिरीश महाजन यांची भेट घेणार असून ते जो आदेश देतील त्यानुसार पुढील निर्णय घेईन,” असा धक्कादायक खुलासा प्रसाद हिरे यांनी केला. त्यामुळे त्यांच्या माघारीची शक्यता सध्या तरी धूसर दिसत आहे.

गोकुळ गीतेंचा आक्रमक पवित्रा; मनधरणीचे प्रयत्न अपयशी

दुसऱ्या बाजूला, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनीही आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. गीते यांची बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केल्याची चर्चा असली, तरी त्यांच्या मनधरणीत नेत्यांना यश आलेले नाही. उलट, जाहीर पाठिंब्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणूक आता खूप पुढे गेली आहे,” असे ठणकावून सांगत गीतेंनी महायुतीच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. विशेष म्हणजे, ही जागा महायुतीत शिवसेना (शिंदे गट) कडे गेल्यानंतर गोकुळ गीते यांचे बंधू तथा भाजप नेते गणेश गीते यांनी पक्षनिष्ठा जपत माघार घेतली होती. मात्र, गोकुळ गीते यांनी आपली स्वतंत्र भूमिका कायम ठेवत निवडणूक मैदान सोडण्यास साफ नकार दिला आहे.

ताज्या बातम्या

कॉमनवेल्थ गेम्स 2026 : ‘ज्यूदो’त भारताची सुवर्ण झेप; अस्मिता डे आणि...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या ज्यूदोपटूंनी इतिहास रचत देशाच्या पदकसंख्येत आणखी दोन सुवर्णपदकांची भर घातली. महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता...