Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Vidhan Parishad Election : बंडखोर गिते, हिरे महायुतीच्या उमेदवाराला देणार पाठिंबा;...

Nashik Vidhan Parishad Election : बंडखोर गिते, हिरे महायुतीच्या उमेदवाराला देणार पाठिंबा; मंत्री महाजन, सामंत यांची माहिती

नाशिक | Nashik

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) मोठा ट्विस्ट आला असून, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांना बंडखोर उमेदवार गणेश गिते आणि प्रसाद हिरे हे पाठिंबा देतील, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलतांना दिली.

- Advertisement -

यावेळी मंत्री महाजन म्हणाले की,”नाशिकमधील बंडखोर उमेदवारांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून, दोन्ही बंडखोर उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देतील. यात गोकुळ गिते यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा झाल्यानंतर ते निर्णय घेतील. तर प्रसाद हिरे यांनी दराडे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे”, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “नाशिकमधील बंडखोर उमेदवारांचा वाद मिटल्यानंतर जळगावमधील (Jalgaon) वादही मिटेल”, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला. तसेच गोकुळ गिते (Gokul Gite) यांच्याशी चर्चा झाली असून, त्यातून सकारात्मक निर्णय होईल”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...