Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik Vidhan Parishad Election : आमदार किशोर दराडेंनी घेतली गणेश गितेंची भेट;...

Nashik Vidhan Parishad Election : आमदार किशोर दराडेंनी घेतली गणेश गितेंची भेट; बंद दाराआड खलबतं, नेमकं काय ठरलं?

नाशिक | Nashik

नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू आणि शिक्षक आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांनी थेट भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या निवासस्थानी धाव घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड साधारण तासाभरापेक्षा अधिक काळ खलबतं झाली.

- Advertisement -

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना किशोर दराडे म्हणाले की, “गणेश गिते यांच्या पत्नी दिपालीताई गिते (Dipali Tai Gite) या नगरसेविका असल्याने आमच्या मतदार आहेत. मी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी त्यांच्याकडे मत मागण्यासाठी आलो होतो. यावेळी त्यांनी मला त्या युतीचा धर्म पाळणार असून महायुतीसोबतच राहतील”, असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याचे दराडे यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “गणेश गिते देखील निवडणुकीच्या स्पर्धेत होते आणि उमेदवारी मागत होते. ही जागा भाजपला (BJP) जाणार की शिवसेनेला, हे आधी स्पष्ट नव्हते. मात्र, आता नियमाने ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली असल्याने आम्ही अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केली आहे”, असेही आमदार (MLA) किशोर दराडे यांनी म्हटले.

गोकुळ गितेंचीही भेट घेणार

अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्याबाबत बोलताना दराडे म्हणाले की, “गोकुळ गिते हे माझे छोटे भाऊ आहेत. मी त्यांचीही भेट घेणार असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मदत करावी, अशी विनंती त्यांना करणार आहे. शेवटी पाठिंबा देण्याचा निर्णय ते स्वतः घेतील”, असेही त्यांनी सांगितले.

कुणाल दराडेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर किशोर दराडेंचे स्पष्टीकरण

मराठी भाषा ही जशी वाकवू तशी वाकते. मी ते सहज बोललो होतो, कारण आमचे ट्युनिंग तसे आहे. पण कोणीतरी अनवधानाने ती क्लिप व्हायरल केली. यात गोकुळ गिते यांचा काहीही संबंध नाही. राजकारणात काही विरोधक असतात, जे दोन पक्षांत किंवा नेत्यांमध्ये आपसात लावून देण्याचे काम करत असतात.माझा पुतण्या सुशिक्षित (पदवीधर) आहे, तो असे चुकीचे बोललेला नाही. त्याने प्रसारमाध्यमांसमोर आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबला पाठवावी, असे त्याने आधीच सांगितले आहे. जर फॉरेन्सिक तपासणीत तो माझा किंवा आमच्या घरातील कोणाचा आवाज असल्याचे सिद्ध झाले आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल, तर मी जाहीर माफी मागायला तयार आहे, असे दराडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

ताज्या बातम्या

चिमुकल्यांच्या स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी उद्या शाळांमध्ये

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik उन्हाळी सुटीच्या आनंदी आठवणींची शिदोरी घेऊन चिमुकली पावले पुन्हा एकदा ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर सोमवारपासून येणार आहेत. या नव्या शैक्षणिक पर्वाच्या मंगल...