Friday, June 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Vidhan Parishad Election : मतांचा भाव फुटत नसल्याने मतदारांमध्ये नाराजी; सहलीपेक्षा...

Nashik Vidhan Parishad Election : मतांचा भाव फुटत नसल्याने मतदारांमध्ये नाराजी; सहलीपेक्षा ‘या’वरच लक्ष केंद्रित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या (Nashik Vidhan Parishad Election) विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडे (Mahayuti) स्पष्ट बहुमत असतानाही, उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या विजयाबाबत धास्ती कायम असल्याने नगरसेवकांना (Corporators) अज्ञातस्थळी रवाना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतांचा भाव फुटत नसल्याने मतदारांमध्ये नाराजी असून, काय भाव फुटतो यावरच सहलीपेक्षा त्यांचे लक्ष केंद्रीय झाले आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे नगरसेवक शनिवारी (दि. १३) सहलीला रवाना झाले. रविवारी (दि. १४) भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नगरसेवकांचा सहलीसाठी जाण्याचा मुहूर्त हुकल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. महायुतीतील भाजपचे प्रसाद हिरे (Prasad Hiray) यांची माघार व अपक्ष गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी ही प्रचार थांबविण्याची घोषणा केली आहे. असे असले तरी मतदानपत्रिकेवर तिन्ही उमेदवारांची नावे कायम राहणार असल्याने, महायुतीकडून खबरदारी घेत नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

शिंदे शिवसेनेचे नगरसेवक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Borste) यांच्या नेतृत्वाखाली शनिवारीच ठाण्याकडे रवाना झाले. भाजपचे नगरसेवक रविवारी सहलीला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, महाजन यांचा दौरा रद्द झाला आणि दिवसभर चर्चेनंतरही भाजपचे नगरसेवक रवाना झाले नाहीत. आता सोमवारी नगरसेवकांना सहलीसाठी पाठविले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची माहिती होती.

भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र येऊन मतदान प्रक्रिया आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सोमवारी मुंबईला जाणार आहेत. निवडणूक केवळ औपचारिकता राहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप

मी कौटुंबिक कामात व्यस्त होतो. रविवारी सहलीला जाऊ शकलो नाही. सोमवारी सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांशी चर्चा करून सहलीचे नियोजन करण्यात येईल.

रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

ताज्या बातम्या