Friday, October 2, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : निदा खानच्या अटकपुर्व जामिनाची सुनावणी 'या' तारखेला

Nashik TCS Case : निदा खानच्या अटकपुर्व जामिनाची सुनावणी ‘या’ तारखेला

नाशिकरोड |प्रतिनिधी| Nashik

नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस कंपनीत महिला सहकार्‍याच्या लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी या गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने पुन्हा राखून ठेवला असून आता अंतिम निकाल दोन मे रोजी देण्यात येणार आहे. त्यामुळे निदा खान हिला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी अटकेची तलवार कायम आहे.

- Advertisement -

नाशिकरोड न्यायालयात सोमवार दि. 27 रोजी या खटल्याची इन कॅमेरा सुनावणी झाली. या सुनावणीत खान हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने राखून ठेवला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील संबंधित संशयित दानिश एजाज शेख (वय 30 रा. मुंबई नाका) व तौसिफ बिलाल अत्तार (वय 38 अशोक मार्ग) यांना यापूर्वीच अटक केलेली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान मात्र फरार होती. अटकेपासून बचाव करण्यासाठी तिने नाशिकरोड न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता.

सुनावणी दरम्यान संशयिताचे वकील राहुल कासलीवाल यांनी निदा खानच्या बाजूने मोठा युक्तिवाद केला. तर सरकारच्यावतीने अ‍ॅड अजय मीसर यांनी बाजू मांडली. निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर 2 मे रोजी निर्णय होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती केजी जोशी यांच्यासमोर पार पडली. दरम्यान यामुळे निदा खान यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...