चिंचखेड | वार्ताहर | Chinchkhed
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) पालखेड धरणातून (Palkhed Dam) पालखेड डावा कालव्यात पिण्याच्या पाण्यासाठी एक जून पासून आवर्तन सोडण्यात आलेले आहे. या कालव्याच्या पाण्यात नाशिक येथील एक युवक पोहताना बुडाला (Drowned) असून सदरील युवकाला (Youth) शोधण्याचे शोधकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हेमंत गोरक्षनाथ कडलग रा. सातपूर,नाशिक असे या युवकाचे नाव आहे. सदरील युवक जोपुळ येथील त्यांच्या नातेवाईकांकडे आला होता. दुपारच्या सुमारास हा युवक पालखेड डावा कालवा जोपुळ हद्दीत पोहण्यासाठी (Swim) गेला असता त्याला पाण्याचा (Water) अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या साथीदाराने गोरक्षनाथला पाण्यात बुडताना पाहून आरडाओरडा सुरू केला.परंतु, पाण्याचा वेग जास्त असल्याने सदर युवक सापडू शकला नाही.
त्यानंतर आज सकाळपासून चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनाचे (Disaster Management) पथक या युवकाचा शोध घेत आहे. तसेच सदर परिस्थितीवर स्थानिक प्रशासन, तलाठी तसेच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या आदेशानुसार वणी पोलीस ठाण्याचे (Vani Police Station) पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.