Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना बालस्नेही...

Nashik News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर

नाशिक | Nashik

बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बालकल्याणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची दखल घेऊन बालस्नेही पुरस्कार (Balsnehi Award) देण्यात येतो. सन २०२४ साठी बालकल्याणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांसाठी देण्यात येणारा उत्कृष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांना जाहीर झाला आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik Zilla Parishad) वतीने महिला व बाल विकास विभागासह शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांची दखल घेत बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी बालस्नेही पुरस्कार जाहीर झाला आहे. सन २०२३ वर्षाचा बालस्नेही पुरस्कार देखील मित्तल यांना देण्यात आला होता.

दरम्यान, सदर पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे सोमवार (दि.०३ मार्च) रोजी होणार असुन कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...