Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik ZP Election : नांदगाव तालुक्यातील 'असे' आहे गट-गणांचे आरक्षण; इच्छुकांचा झाला...

Nashik ZP Election : नांदगाव तालुक्यातील ‘असे’ आहे गट-गणांचे आरक्षण; इच्छुकांचा झाला हिरमोड

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon

नांदगाव पंचायत समितीच्या (Nandgaon Panchayat Samiti) सभापतीपदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्री निघाल्यानंतर आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता नवीन तहसील कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी अभिजीत नाईक, तहसीलदार सुनील सौदाणे यांच्या उपस्थितीत श्रेयस काकडे या लहान मुलांच्या हस्ते सहा गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली.

- Advertisement -

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) एकूण आठ पैकी चार गण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या चार पैकी दोन गट पुरुषांसाठी आणि दोन महिलांसाठी आरक्षित (Reserved) झाले आहेत.

दरम्यान, नांदगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्याने काही इच्छुकांची हिरमोड झाला आहे. तर काही इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणांचे आरक्षण

भालूर – अनुसूचित जाती, जातेगाव – सर्वसाधारण, वेहळगाव – अनुसूचित जमाती, साकोरा – अनुसूचित जमाती (महिला), सावरगांव – ना.मा.प्र (महिला), न्यायडोंगरी – सर्वसाधारण (महिला), पानेवाडी – सर्वसाधारण (महिला), मांडवड – नागरीकांचा मागासवर्गीय प्रवर्ग, याप्रमाणे आरक्षित झाले आहे.

गटांचे आरक्षण

नांदगाव तालुक्यातील भालूर व न्यायडोंगरी हे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी आणि जातेगाव व साकोरा हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...