नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) गट आरक्षण सोडतीकडे इच्छुकांच्या नजरा लागलेल्या असतानाच ग्रामविकास विभागाने राखीव जागांचे चक्रीय आरक्षण संपुष्टात आणून नव्याने आरक्षण (Reservation) सोडत काढणार असल्याचे परिपत्रक काढले आहे. या निर्णयामुळे आदिवासी भागाबरोबरच बिगर आदिवासी भागातही स्थानिकांना मिनी मंत्रालयाच्या पायऱ्या चढण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. यामुळे इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत.
जुन्या पद्धतीमुळे गट आरक्षित (Group Reservation) होण्याची सर्वाधिक धास्ती असलेल्या बिगर आदिवासी भागातील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची निवडणूक (Election) लढवण्याची इच्छा आता पूर्ण होणार आहे. विशेषतः आदिवासी भागात बिगर आदिवासी भागाचे होणारे संभाव्य अतिक्रमण यामुळे टळणार असल्याने आदिवासी भागातील इच्छुकांनाही आता आपापल्या भागातूनच संधी मिळणार आहे. मात्र, बिगर आदिवासी भागातील राखीव प्रवर्गातील इच्छुकांचा मात्र हिरमोड होणार आहे.
नवीन आरक्षण सोडत परिपत्रकामुळे जिल्ह्यातील (Dindori) दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सहा तालुक्यांमधील गट आदिवासींसाठीच राखीव होण्याची शक्यता आहे. तर बिगर आदिवासी क्षेत्र असलेल्या निफाड, केला, नदगाव, सिजर, मालेगाव, चोदवड व देवज्य या तालुक्यातील गट हे सर्वसाधारण ओबीसीसाठी राजीव होऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बागलाण व नाशिक तालुक्यातील प्रत्येकी दोन गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव राहू शकतात याबरोकाच १५ तालुक्यामधील पाच जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीच राहतील.
असे राहील आरक्षण
नवीन रचनेनुसार जिल्हा परिषदेचे एकूण गट ७४ राहणार आहेत. यामध्ये आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २९, सर्वसाधारण २०, ओबीसी २० आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच असे आरक्षण निघणार आहे. यामध्ये ५० टक्के म्हणजेच ३७ जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. त्यामुळे महिलांसाठी कोणते गट आरक्षित निघतात याकडे विशेषतः, पुरुष मंडळींचे लक्ष राहणार आहे.
… तर यांना मिळू शकते संधी
निफाडमधून (Niphad) माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, पंढरीनाथ थोरे, माजी उपाध्यक्ष दिंगबर गिते, सिध्दार्थ वनारसे, दीपक शिरसाठ, अमृता पवार, डी. के. जगताप, शिवा सुरासे, मंदाकिनी बनकर, गणेश बनकर, भास्कर बनकर, यतिन कदम, येवल्यातून माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी सभापती संजय बनकर, संभाजी पवार, सुरेखा दराडे, महेंद्रकुमार काले, नांदगावमधून माजी सभापती आश्विनी आहेर, संजय पवार, राजेंद्र पवार,अंजुम कांदे, तेज कवडे, चांदवडमधून माजी आमदार शिरीष कोतवाल, डाॅ. आत्माराम कुंभार्डे, माजी उपाध्यक्ष डाॅ. सयाजी गायकवाड, कारभारी आहेर, खंडेराव आहेर, बाळासाहेब माळी, अमोल भालेराव, सिन्नरमधून माजी अध्यक्षा शीतल सांगळे, सिमंतिनी कोकाटे, उदय सांगळे, भारत कोकाटे, बाळासाहेब वाघ, निलेश केदार आदींना मिनी मंत्रालयाची पायरी चढण्याची पुन्हा संधी आहे.
… तर यांचा होणार हिरमोड
त्र्यंबकेश्वरमधून (Trimbakeshwar) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, इगतपूरीतून अॅड. संदीप गुळवे, माजी सभापती अलका जाधव, गोरख बोडके, उदय जाधव, निवृत्ती जाधव, सुनील वाजे, दिंडोरीतून माजी अध्यक्षा विद्या पाटील, मविप्रचे संचालक प्रविण जाधव, माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राजाभाऊ ढगे, शाम बोडके, विलास कड, कळवणमधून रविंद्र देवरे, शैलेश पवार, भूषण पगार, रोहित पगार यांना मात्र फटका बसण्याची शक्यता आहे.
यांचा जीव मात्र टांगणीला
लोकसंख्येच्या उतरत्या क्रमात नाशिक, बागलाण व देवळा तालुक्यातील काही गटही राखीव होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक तालुक्यातून माजी सभापती विष्णुपंत म्हैसधुणे, दिलीप थेटे, संजय तुंगार, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, अजिंक्य गोडसे, भक्ती गोडसे, देवळ्यातून माजी सभापती केदा आहेर,धनश्री आहेर, बागलाणमधून यशवंत पाटील, यतिन पगार, प्रशांत (पप्पू तात्या) बच्छाव, संजय सोनवणे यांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे.





