नाशिक | प्रतिनिधी Nashik
सर्वांनाच वेध लागले आहेत ते बाप्पांच्या आगमनाचे. अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थी निमित्त अनेकांनी सजावटीसाठी कंबर कसली आहे. बाजारात देखाव्यांचे साहित्य विक्रीसाठी आले आहे. पुढे गर्दी होण्याच्या भीतीने अनेकांनी आताच साहित्य खरेदीला पसंती दिलेली दिसून येत आहे. दरम्यान, बाजारात तुरटी व शाडू मातीच्या गणेशमूर्ती दाखल झाल्या असून नागरिकांची इको फ्रेंडली गणेश मूर्तींना पसंती मिळताना दिसून येत आहे.