नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या चिमुकल्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील नाणेघाटचा प्रसिद्ध वानरलिंगी सुळका सर केल्याचा विक्रम केला आहे. पलाक्ष मंत्री असे या चिमुकल्याचे नाव असून अवघे आठ वर्षे त्याचे वय आहे.
२५ जानेवारीला पलाक्षने त्याच्या १२ वर्षीय आरव मंत्री या भावासोबत या सुळकयावर चढाई केली. यात पलाक्षला दीड तास तर आरवला अवघ्या तासाभराचा वेळ लागला.
हा सुळका ४३० फुट उंचीचा आहे. पलाक्षाच्या यशस्वी कामगिरीमुळे तो लहान वयात हा सुळका चढणारा पहिला मुलगा ठरला आहे. विशेष म्हणजे पालाक्ष हा राष्ट्रीय कराटेचा खेळाडूअसून त्याने या खेळातही नाविन्यपूर्ण कामगिरीचा ठसा उमटवला आहे.
नाशिकच्या ट्रेक पाॅईन्ट ब्रेक अॅडव्हेंचर संस्थेकडून दोघा भावंडांनी ही चढाई केली. पलाक्ष अशोका युनिवर्सल शाळेचा विद्यार्थी असून तिसऱ्या इयत्तेत तो शिक्षण घेत आहे.
पलाक्षचा मोठा भाऊ आरव याने ८ मे २०१९ मध्ये उन्हाळी शिबिरात एस्वेस्ट बेस कॅम्प सर करण्याचा विक्रम केला होता. आरवला जगातील सात उंच शिखरे सर करावयाची असून त्यादृष्टीने त्याची वाटचाल सुरु आहे. नुकतेच आरवने या सात पर्वतापैंकी एक पर्वत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजरो शिखर सर करून पहिले स्वप्न पूर्ण केले आहे.
आरवचे पुढचे लक्ष उत्तर अमेरिकेतील शिखर सर करायचे आहे. आरवदेखील स्केटिंगचा खेळाडू असून त्याने आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. शहरातील डॉ. पिंपरीकर यांच्या स्पोर्टसमेड रीहाब सेंटरमध्ये तो डॉ. मुस्तफा टोपीवाला यांच्या जीममध्ये सराव करतो.
मुलांना छंद जोपासता आली पाहिजेत
मुलांना छंद जोपासता आली पाहिजेत. त्यांना त्यांच्या करियरच्या वाटा लहानपनापासून दाखवल्या गेल्या पाहिजेत. यासाठी माझ्या दोन्ही मुलांना मी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आणि सोशल माध्यमांमध्ये न गुंतवता गिर्यारोहणाला पाठवते. मुलांची कामगिरी बघून मनस्वी आनंद वाटतो अशी प्रतिक्रिया पलाक्षाची आई शिवानी मंत्री यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.