नाशिक । प्रतिनिधी Nashik
बिहार, पाटीलपुत्र येथे नुकत्याच झालेल्या युथ गटाच्या 20व्या राष्ट्रीय अॅथलेटीक्स स्पर्धेत नाशिकची धावपटू भूमिका नेहतेने उत्तम कामगिरी नोंदवत 200 मीटर धावणे स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी घातली. तिने हे अंतर 24.99 सेकंदात पूर्ण करून महाराष्ट्राला हे पदक मिळवून दिले.
- Advertisement -
भूमिका ही गेल्या चार वर्षांपासून विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, हिरावाडी, नाशिक येथे राष्ट्रीय एन. आय. एस. प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. तिच्या या यशाबद्दल जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा