Saturday, May 4, 2024
Homeनाशिकअकरावी प्रवेशातील नाशिकचा कट ऑफ ९५ टक्के

अकरावी प्रवेशातील नाशिकचा कट ऑफ ९५ टक्के

नाशिक | Nashik

इयत्ता अकरावीची दुसरी गुणवत्तायादी शनिवारी (दि. ५) जाहीर करण्यात आली असून, आरवायके महाविद्यालयात खुल्‍या प्रवर्गाचा कट ऑफ ९५ टक्‍के राहिला, तर वाणिज्य शाखेतून बीवायके महाविद्यालयाचा कट ऑफ ९४ टक्‍के इतका आहे.

- Advertisement -

दुसऱ्या यादीत सहा हजार ७६९ विद्यार्थ्यांचा समावेश असून, यापैकी दोन हजार ८८४ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रवेश निश्‍चितीसाठी बुधवार (दि. ९)पर्यंत मुदत असणा आहे.

यापूर्वी पहिल्‍या गुणवत्ता यादीत विज्ञान शाखेतील खुल्‍या गटाचा कट ऑफ ९५.५० टक्‍के होता.

यात केवळ अर्धा टक्‍का घट होऊन दुसऱ्या यादीतील कट ऑफ ९५ टक्‍के राहिला आहे. दुसऱ्या यादीत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांमध्ये एक हजार २६४ विद्यार्थी कला शाखेसाठी, दोन हजार ३३४ विद्यार्थी वाणिज्‍य, तर तीन हजार ४८ विद्यार्थी विज्ञान शाखेसाठी पात्र ठरले आहेत.

दरम्‍यान, दुसऱ्या यादीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असेल. दरम्यान, कला शाखेतून एचपीटी महाविद्यालयाचा खुल्‍या प्रवर्गाचा कट ऑफ ८९ टक्‍के राहिला.

तर केटीएचएम महाविद्यालयात आणि भोसला महाविद्यालयात ८० टक्क्यांचा कट ऑफ आहे. त्‍यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये कला शाखेत प्रवेशासाठीदेखील चुरस आहे.

प्रवेश निश्‍चित

गुणवत्तायादी जाहीर होताच विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीची संधी उपलब्‍ध होती. त्‍यानुसार शनिवारी (दि. ५) सायंकाळी पाचपर्यंत कोटा प्रवेशातून ४५ विद्यार्थ्यांनी, तर कॅप राउंडच्‍या माध्यमातून १९३ अशा एकूण २३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या