Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार चालना - जलज शर्मा

नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार चालना – जलज शर्मा

पहिल्या दोन औद्योगिक नगर रचना योजनांचे मोजणीचे काम अंतिम टप्प्यात

नाशिक | जिमाका वृत्तसेवा

- Advertisement -

नाशिक महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणामार्फत सिन्नर तालुक्यातील मौजे मोह व चिंचोली येथे औद्योगिक नगर रचना योजना प्रस्तावित आहेत. या नगर रचना योजनांना 16-21 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासनाच्या राजपत्रान्वये प्रारूप नगररचना योजना मौजे चिंचोली, तालुका सिन्नर क्रमांक 1 व 2 (औद्योगिक प्रयोजनार्थ) मंजुरी प्राप्त झाली आहे. या औद्योगिक नगर रचना योजनांमुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणारअसल्याचे महानगर आयुक्त जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

YouTube video player

आयुक्त शर्मा यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी समवेत महानगर नियोजनकार जयश्रीराणी सुर्वे, उपमहानगर अभियंता शरद साळुंखे, उपमहानगर नियोजनकार अथर्व खैरनार, सहाय्यक नियोजनकार शिवानी वामन व योजनेतील भूधारक उपस्थित होते.

प्रत्यक्ष जागेवर भूमी अभिलेख विभागामार्फत अंतिम भूखंडाची व रस्त्यांच्या मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून जागेवर अंतर्गत रस्ते, विजेचे खांब, भूमिगत गटारी , पाण्याची व्यवस्था इत्यादी कामे प्रगतीपथावर आहेत. योजनांमुळे पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती, आर्थिक विकासाला चालना इत्यादी लाभ समाविष्ट भूधारकांना मिळणार असून या योजनांमुळे परिसरातीसह औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे आयुक्त शर्मा यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...