Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनाशिकच्या गिर्यारोहकांकडून 'फ्रेंडशिप’ शिखर सर

नाशिकच्या गिर्यारोहकांकडून ‘फ्रेंडशिप’ शिखर सर

नाशिक | प्रतिनिधी

हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मनालीजवळ (Manali) असलेले समुद्रासपाटीपासून साधारण १७ हजार ४०० फूट उंचावरील ’फ्रेंडशिप’ (Friendship Peak) हे अत्यंत अवघड शिखर नाशिकच्या गिर्यारोहक मित्रांच्या टीमने नुकतेच सर केले.त्यात मिलिंद लोहोकरे, संदीप चाकणे, मानस लोहोकरे आणि योगेश गायकवाड आदींचा समावेश आहे. हे बालपणीचे मित्र आपल्या आपल्या वयाला हरवून मैत्रीचा वेगळा अर्थ शोधण्यासाठी या मोहिमेत सहभागी झाले होते.

- Advertisement -

’फ्रेंडशिप पिक’ शिखरासाठी २८ जूनला सोलंग गावातून चढाईला सुरुवात करत, दि. २ जुलैला टीममधील सगळ्यात तरुण गिर्यारोहक मानस लोहोकरे याने समिट केले. मिलिंद लोहोकरे यांनी समिटच्या अगदी अलीकडे म्हणजे १७ हजार १०० फुटांपर्यंत यशस्वी मजल मारली, तर संदीप चाकणे आणि योगेश गायकवाड यांनी १४ हजार फुटांपर्यंतची चढाई पूर्ण केली. अनेक गिर्यारोहण मोहिमा एकत्र केलेले ५६ वर्षांचे मिलिंद लोहोकरे आणि ५३ वर्षांचे चाकणे हे २५ वर्षांचा मानस लोहोकरे याला त्यातले आव्हान देत खुणावत होते.

मोहिमांमधील थरार, तयारी आणि इतक्या उंचावरील निसर्गाचे रूप या गोष्टी सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने योगेश गायकवाड मोहिमेत सहभागी झाले होते. कमी ऑक्सिजन, प्रचंड थंडी, मर्यादित रिसोर्सेस अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत या टीमने आपापल्या पद्धतीने मैत्रीचा अर्थ शोधत हे टीम समिट यशस्वी केले. वडील-मुलगा, बालपणीचे मित्र आणि व्यवसायानिमित्त झालेल्या मित्रांनी स्वतःच्या क्षमतेला आव्हान देत फ्रेंडशिप शिखर सहज सर केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या