Monday, April 28, 2025
Homeमनोरंजननाशिकच्या रोहितच्या ' झूठा प्यार' गाण्याला प्रेक्षकांची पसंदी

नाशिकच्या रोहितच्या ‘ झूठा प्यार’ गाण्याला प्रेक्षकांची पसंदी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केवळ मुंबई पुण्यासारख्या नाटक चित्रपट क्षेत्रात नाव आसलेल्या शहरांपलीकडे एक वेगळी सांस्कृतिक ओळख असलेल्या नाशिक शहरातील युवावर्गही आता कोणत्याच बाबतीत मागे नाही. चित्रपटासाठी आधुनिक तंत्रज्ञान असो की मनाला भिडणारे गाण्याचं चित्रीकरण. अशाच एका हृदयाला भिडणाऱ्या गाण्याला आपल्या नजरेतून प्रेक्षकांच्या भेटीला ‘झूठा प्यार’ हे गाणे Jhootha Pyar Song नाशिकच्या तरुण दिग्दर्शक रोहित जाधव ने Director Rohit Jadhav आणल आहे.

- Advertisement -

या तरुणाने दिग्दर्शित केलेल गाणं दि.२२ ऑक्टोबर ला नाटय, सिनेमागृह खुल्या होण्याच्या मुहूर्तावर त्यांच्या च्या कलर शैडो आणि ड्राय डे डिजिटल च्या संयुक्त विद्यमाने प्रशांत नकती ऑफिशिअल यूट्यूब वर रिलीज करण्यात आले आणि त्यानंतर अवघ्या एका दिवसात गाण्याने १० लाखाच्यावर व्हिव्युज सह प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात यश संपादन केल आहे.

प्रशांत नकती यांनी हे गाणं लिहिलेल आणि संगीत बद्ध केलं असून, केवल वालनाज आणि सोनाली सोनवणे यांनी ते गायले आहे. याची पटकथा रोहित जाधव व स्वप्निल पाटिल याने लिहिली आहे तर दिग्दर्शन रोहित यानेच केले आहे.

या गाण्यात श्रद्धा पवार आणि निक शिंदे या कलावंतांच्या प्रमुख तर सोनाली सोनवणे हिची सहाय्यक भूमिका आहे. या गाण्याचे चित्रीकरण नाशिक शहराच्या वेगवेगळ्या परिसरात करण्यात आले असून, त्यानिमित्ताने नाशिकत या तरुणांच्या रूपाने नव्या धाटणीच्या प्रयोगशील कलाकृतींना भविष्यात चांगलीच गती मिळणार असल्याचे चित्र आहे.

या आधी रोहित जाधव या तरुणाने अनेक गाण्यांसाठी सह दिग्दर्शकाच्या भूमिके सोबतच लाईन प्रोड्युसर, कला दिग्दर्शनाचही , लेखक म्हनुण काम केले आहेत.

या आधी ‘माझी बायगो ‘गाणं केलं तो अनुभव नवीन होता. पण तरीही प्रेक्षकांनी त्याला खूप प्रेम दिलं. त्यामुळे ‘ झूठा प्यार ‘ हे गाणं करतांना एक वेगळ दडपण होत. लोकांना ते किती आवडेल किती नाही. पण त्या गाण्या सारख किंबहुना त्यापेक्षा जास्तच चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे मुख्य कलाकार सोडले तर बाकी सगळे नाशिकचे कलाकारांना घेवुन ही मोठी झेप घेता आली याचा आनंद आहे.

रोहित जाधव (दिग्दर्शक, झूठा प्यार गाणे) Rohit Jadhav (Director,Jhootha Pyar Song)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...