Friday, November 15, 2024
Homeजळगाव200 कोटींच्या निधीतून नशिराबादचा होतोय कायापालट-गुलाबराव पाटील

200 कोटींच्या निधीतून नशिराबादचा होतोय कायापालट-गुलाबराव पाटील

जळगाव । प्रतिनिधी

खा.संजय राऊत हा तिकीट विकणारा माणूस असून जळगाव ग्रामीणचे तिकीट अशाच पद्धतीने विकले गेले काय? राजकारणातला माझा बाप एकच तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे असून ‘धनुष्यबाण’माझी आण, बाण आणि शान आहे, अशा शब्दात संजय राऊत यांची खिल्ली उडवली.

- Advertisement -

धनुष्यबाणाला मतदान करून आपली मतपेटी ही नशिराबादचे विकासाचे भविष्य घडविणारी असून नशिराबादाचा चेहरा-मोहरा बदलवून संपूर्ण कायापालट करणारच अशी ग्वाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथील जाहीर सभेत दिली. ते पुढे म्हणाले की, विविध विकास कामांसाठी सुमारे 200 कोटींच्या निधीची तरतूद केली. या निधीतून शहराचा विकास करण्यात येत आहे.

यामध्ये 60 कोटींची पाणीपुरवठा योजना, 61 कोटींची भुयारी गटार योजना, झेंडुजी महाराज मंदिरासाठी 5 कोटी, भवानी मंदिर परिसर विकासासाठी 2.5 कोटी, नशिराबाद ते सूनसगाव आणि विविध गावांपर्यंतच्या रस्त्यांसाठी 15 कोटी, नगरपालिकेची नवीन इमारत, नवीन स्मशानभूमी, शहरातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, विविध सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, कब्रस्तान, संरक्षक भिंत या कामांसाठी निधी मंजूर असून अनेक कामे पूर्णही झाली आहेत. नशिराबादच्या आसपासच्या भादली, बेळी, निमगाव परिसरातील शेतकर्‍यांना बांधावर बंदिस्त पाईपलाईन द्वारे थेट पाणी पोहोचविण्याचे कामही पूर्ण झाले असून या सर्व विकास कामांमुळे नशिराबादचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलत आहे.
यावेळी रॉ.का.चे जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेनेचे संजय पवार, मुकुंदराव नन्नवरे, भाजपाचे संजय महाजन, सुभाषअण्णा, लालचंद पाटील, असलम सर, विकास पाटील यांच्यासह अनेकांनी गुलाबराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर रॉ.का.चे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी महापौर ललित कोल्हे, सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे, रिपाईचे अनिल अडकमोल, भरत मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता-कोल्हे माळी, माजी जि. प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प.सदस्य पवन सोनवणे, कमलाकर रोटे, भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे, पियुष कोल्हे, विकास पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या