अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सरकारच्यावतीने राबवण्यात येणार्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत जिल्ह्यासाठी 43 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे मार्चअखेर शेतकर्यांच्या डोक्यावर आर्थिक भार कमी होणार असून विविध योजनेत पात्र ठरलेल्या शेतकर्यांना कृषी विभागाच्यावतीने लवकरच अनुदान वाटप होणार आहे. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत 43 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यात राष्ट्रीय कृषी विकास योजना कांदा चाळ यासाठी सर्वसाधारणमध्ये 74 लाख 55 हजार, अनुसूचित जातीमध्ये 7 लाख 78 हजार आणि अनुसूचित जमातीमध्ये 1 लाख 40 हजार असा एकूण 83 लाख 82 हजारांचा निधी, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेत सर्वसाधारणमध्ये 4 कोटी 92 लाख, अनुसूचित जातीमध्ये 9 लाख 20 हजार आणि अनुसुचित जमातीमध्ये 20 लाख 69 हजार असा एकूण 5 कोटी लाख 21 हजारांचा निधी, संरक्षित शेती योजनेत सर्वसाधारणमध्ये 2 कोटी 5 लाख, अनुसूचित जातीमध्ये 1 कोटी 6 लाख आणि अनुसुचित जमातीमध्ये 1 कोटी 42 लाख असा एकूण 4 कोटी 54 लाखांचा निधी, भाजीपाला- रोपवाटिका योजनेत सर्वसाधारणमध्ये 2 लाख 49 हजार, मिलेट योजनेत सर्वसाधारणमध्ये 1 कोटी 98 लाख, अनुसूचित जातीमध्ये 49 लाख 12 हजार आणि अनुसुचित जमातीमध्ये 23 लाख 74 हजार असा एकूण 2 कोटी 71 लाखांचा निधी, यांत्रिकिकरण योजनेत सर्वसाधारणमध्ये 22 लाख 65 हजार, अनुसूचित जातीमध्ये 22 लाख 26 लाख 57 हजार आणि अनुसुचित जमातीमध्ये 25 लाख 72 हजार असा एकूण 74 लाख 94 हजारांचा निधी, तर ठिबक- तुषार योजनेत सर्वसाधारणमध्ये 25 कोटी 50 लाख, अनुसूचित जातीमध्ये 2 कोटी 76 लाख आणि अनुसुचित जमातीमध्ये 78 लाख 45 हजार असा एकूण 29 कोटी 5 लाखांच्या निधीचा समावेश आहे.