Monday, May 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजJyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा ट्विस्ट; नवीन...

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा ट्विस्ट; नवीन कनेक्शन आले समोर

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

पाकिस्तानसाठी (Pakistan) हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाच्या (Haryana) हिसारमधील ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राला (Jyoti Malhotra) अटक करण्यात आली आहे. ज्योतीच्या अटकेनंतर दोन दिवसांनी, हिसारचे एसपी शशांक कुमार सावन यांनी या प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली.यामध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा (PIO) ज्योती मल्होत्राला त्यांची हेर बनवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच ज्योती अनेक वेळा पाकिस्तानला गेली होती. याशिवाय पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापूर्वीही ती पाकिस्तानलाही गेली होती. याआधी ती चीनलाही गेली होती, अशी माहिती शशांक कुमार सावन यांनी दिली होती. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विट आला होता.

त्यानंतर आणखी एक ट्विस्ट या प्रकरणात आला असून, ज्योती हिच्यासोबत आणखी एक यूट्यूबर प्रियांका सेनापतीचेही (Priyanka Senapati) नाव समोर आले आहे. प्रियंका ही ज्योती मल्होत्राची साथीदार असल्याने तिची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे, असे पुरीचे पोलिस अधीक्षक (एसपी) विनीत अग्रवाल यांनी सांगितले आहे. तसेच ज्योतीशी असलेले तिचे संबंध आणि कर्तारपूर कॉरिडॉरला तिने केलेल्या प्रवासाची चौकशी देखील एजन्सीकडून करण्यात येत आहे. तर प्रियांका सेनापतीने “ज्योती माझी फक्त एक मैत्रीण होती आणि मी तिच्याशी YouTube द्वारे संपर्कात आले, असे तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते.

प्रियांका सेनापती नेमकी कोण आहे?

कंटेंट क्रिएटर असलेली प्रियांका सेनापती ही पुरीची रहिवासी आहे. प्रियांकाचे यूट्यूबवर १४ हजार ६०० सबस्क्रायबर्स आहेत तर इंस्टाग्रामवर तिचे २० हजार फॉलोअर्स आहेत. ती ओडिशा तसेच देशाच्या इतर भागांमधील तिच्या प्रवासाचे व्हिडिओ देखील पोस्ट करते. २५ मार्च रोजी प्रियांका सेनापतीने तिच्या यूट्यूब चॅनल ‘Prii_vlogs’ वर पाकिस्तानमधील ओडिया गर्ल | करतारपूर कॉरिडॉर मार्गदर्शक असा तिच्या पाकिस्तान प्रवासाचा ‘ओरिया व्लॉग’ नावाचा व्हिडिओ पोस्ट केला होता.

ज्योतीबाबत पत्रकार परिषदेत पोलिसांनी नेमकं काय म्हटले होते?

पोलिस (Police) म्हणाले होते की, “केंद्रीय एजन्सीने हरियाणा पोलिसांना माहिती दिली होती की PIO सोशल मीडियावर प्रभाव असलेल्या लोकांना अडकवत आहेत. ते भारताविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी हे करत आहेत. हरियाणा पोलीस केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने ज्योतीची चौकशी करत आहेत. ज्योतीच्या उत्पन्नाच्या स्रोत पाहिले तर ते परदेशात जाण्याइतके नाही. तिला बाहेरुन निधी मिळत असावा असा आम्हाला संशय आहे. ज्योती मल्होत्रा थेट पीआयओच्या संपर्कात होती. ज्योती मल्होत्राला संवेदनशील संरक्षण माहिती थेट उपलब्ध नव्हती. पण, भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वेळी तिचा पीआयओशी संपर्क चिंताजनक होता. पाकिस्तान भेटीदरम्यान तिने अनेक उच्चपदस्थ लोकांची भेट घेतली. जरी त्याची अटक (Arrested) अलिकडेच झालेली असली तरी, गुप्तचर संस्था तिच्या हालचालींवर फार पूर्वीपासून बारकाईने लक्ष ठेवून होत्या” असे त्यांनी सांगितले होते.

दानिशनेच ज्योतीला हनीट्रॅप केले होते

दरम्यान, दानिश व ज्योती यांच्यातील संबंधांबाबत सध्या तर्क-वितर्क लावले जात आहेत. दानिशनंच ज्योतीला हनीट्रॅप केल्याचा दावा जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक शेश पॉल वैद यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये केला आहे. तसेच, पहलगाम हल्ल्याआधी काही महिने ज्योती या ठिकाणी जाऊन आली होती, हा फक्त योगायोग नाही, असंही ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत. यासोबत ज्योती मल्होत्राचा पहलगाम येथे काढलेला व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोटाचा

हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला, ISISशी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi हैदराबादमध्ये पाकिस्तानची दहशतवादी संघटना असलेल्या आयसीसशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप...