Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIndia vs Pakistan : पाकिस्तानच्या सीमेत चुकून गेलेल्या BSF जवानाची २० दिवसांनी...

India vs Pakistan : पाकिस्तानच्या सीमेत चुकून गेलेल्या BSF जवानाची २० दिवसांनी सुटका; अटारी बॉर्डरवरुन पूर्णम कुमार शॉ परतले

नवी दिल्ली | New Delhi 

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या (Pakistan) ताब्यात असलेला भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पूर्णम कुमार शॉ (Purnam Kumar Shaw) यांना पाकिस्तानने सोडले आहे. भारताने पूर्णम कुमार शॉ यांच्या बदल्यात पाकिस्तानी रेंजर्सना परत पाठवले आहे. भारताचे जवान पूर्णम कुमार शॉ यांना पाकिस्तानने भारताकडे सोपवले असून, ते अटारी बॉर्डरवरुन परत आले आहेत. काही दिवसांपूर्वी पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती आणि ते पाकिस्तानमध्ये गेले होते. त्याठिकाणी पाकिस्तानी सैन्याने पूर्णम कुमार शॉ यांना ताब्यात घेतले होते.

यानंतर मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूरनंतर युद्ध (India Pak War) सुरु झाले होते. त्यामुळे पूर्णम कुमार शॉ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. पाकिस्तानने त्यांना २३ एप्रिल रोजी पकडले होते. मात्र, आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांना सोडले आहे. तर भारताने सुद्धा पाकिस्तानी रेंजर्सच्या एका सैनिकाला पकडले होते. आता दोन्ही देशांनी जवान आणि रेंजर्सच एक्सेंज केले असून, जवान आणि रेंजर्सची एक्सेंज करण्याची प्रक्रिया सकाळी १०.३० वाजता अटारीमध्ये (Atari) झाली.

दरम्यान, भारत-पाक (India vs Pak) सीमारेषेवर शेतकऱ्यांच्या (Farmer) देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफचे दोन जवान तैनात केले होते. फिरोजपूरमध्ये २३ एप्रिलला जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती. ही गोष्ट पाकिस्तानी सैन्याच्या लक्षात आल्यानंतर पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील सगळी शस्त्रात्रे जप्त करुन पाकिस्तानने गेल्या २० दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवले होते.

भारतानेही पाकिस्तीनी रेंजरला सोडले 

बीएसएफने राजस्थानमधील भारतीय सीमेजवळ एका पाकिस्तानी रेंजरला पकडले होते. त्याला देखील आज पाकिस्तानकडे सुखरूप सोपवण्यात आले आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने एका पाकिस्तानी रेंजरला अटक केली होती. पाकिस्तानी रेंजर सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी या रेंजरला पकडले होते.

भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतला पहलगामचा बदला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला होता. या हल्ल्यांमध्ये जवळपास १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यात दहशतवाद्यांचाही सहभाग आहे.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...