संगमनेर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रम स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मार्फत उच्च शिक्षण संस्था, महाविद्यालय व विद्यापीठ यांच्या करिता स्वच्छ परिसर रँकीग-2019 हा उपक्रम राबविण्यात आला होता़ या उपक्रमात संगमनेरच्या अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयास ‘स्वच्छ व स्मार्ट परिसर अंतर्गत उत्कृष्ट कार्यपध्दती’ या कॅटेगरीमध्ये असाधारण व उल्लेखनिय कामगिरीसाठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
देशपातळीवरील एकूण 6900 महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्था, प्राद्योगिक संस्था व विविध विद्यापीठांनी यामध्ये भाग घेतला होता. नवी दिल्ली येथील तंत्रशिक्षण परिषदेच्या सभागृहामध्ये पार पडला. हा पुरस्कार महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे व समन्वयक डॉ. निलेश माटे यांनी स्विकारला.
देशभरातील 73 निवडक संस्था व महाविद्यालयांना ‘स्वच्छ व स्मार्ट परिसर, एक विद्यार्थी एक वृक्ष अभियान, जल शक्ती अभियान, सौर ऊर्जा लॅम्प अभियान व उत्कृष्ठ पध्दती’ या वेगवेगळ्या 5 गटांमध्ये उल्लेखनिय काम केलेल्या संस्था व महाविद्यालयांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुध्दे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. धिरेंद्रपाल सिंह, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव प्रा. आर. सुब्रमण्यम आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सदर समारंभास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगव्दारे मार्गदर्शन केले.
अमृतवाहिनीला स्वच्छ व हरित परिसराचा राष्ट्रीय पुुरस्कार

ताज्या बातम्या
Nashik News : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे दिल्लीत धरणे आंदोलन
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आयटक संलग्न संघटनांच्या महासंघाच्या अंतर्गत दिल्ली (Delhi) येथील जंतरमंतर येथे नाशिकच्या (Nashik) बांधकाम कामगारांनी (Construction Workers) भव्य धरणे आंदोलन (Agitation)...