Sunday, May 18, 2025
Homeधुळेराष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने केले राईनपाडा आश्रमशाळेचे कौतूक

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने केले राईनपाडा आश्रमशाळेचे कौतूक

साक्री Sakri । प्रतिनिधी

- Advertisement -

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे (National Commission for Scheduled Tribes) (नवी दिल्ली) उपसंचालक एस.पी.मीना व आर.के.त्रिपाटी हे नुकतेच तालुक्याच्या दौर्‍यावर आले होते. प्रसंगी त्यांनी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, राईनपाडा (Rainpada Ashram School) प्रकल्प या आश्रम शाळेला भेट दिली. (visited)

याप्रसंगी त्यांच्या सोबत धुळे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, डीवायएसपी प्रदीप मैराळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर, सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश गावित, पं.स सदस्य उपस्थित होते.

यावेळी प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतुन धुळे प्रकल्पातील शासकीय अनुदानित 56 आश्रम शाळेतील इयत्ता दुसरी ते नववीच्या 15 हजार 875 विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देण्यात आलेले जातीचे दाखले व आदिवास प्रमाणपत्र मोफत वाटप योजनेचे समितीने कौतुक केले.

तसेच राईनपाडा आश्रमशाळेचे संजय धर्मा गवळी, रुपली दीपक कामडे, मनीषा माधव कामडे, कुणाल धाकल्या चौरे, राणी बागुल या विद्यार्थ्यांना उपसंचालक एस.पी.मीना व आर. के.त्रिपाठी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी राईनपाडा आश्रमशाळेचे ब्रीद वाक्य एकच ध्यास विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास या फलकाचे अनावरण, परस फुल बाग व वृक्षारोपण, कारंज्याचे उद्घाटन मान्यवरांसह स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आश्रमशाळेतील डिजिटल क्लास रूम, मास्टर क्लास रूमला एस.पी.मीना व आर.के.त्रिपाठी व मान्यवरांनी भेट दिली. दुर्गम आदिवासी भागात अशा आधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर होत असल्याचे पाहून प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेचे व आश्रमशाळा मुख्याध्यापक सुभाष जाधव यांच्यासह शिक्षकांचे कौतुक केले.

आश्रमशाळेतील भौतिक सुखसुविधा, शालेय इमारत, वस्तीगृह व शाळा परिसर स्वच्छता आदी बाबी राष्ट्रीय अनुसूचित जन जाती आयोगाचे उपसंचालक एस.पी.मीना व आर.के.त्रिपाठी यांनी समाधान व्यक्त करून कार्याचा गौरव करून अभिप्राय दिला. भविष्यात बारावीपर्यत राईनपाडा आश्रम शाळेत शिक्षणाची सुविधा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खैरनार यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Solapur Fire : सोलापुरातील अग्नितांडवात ८ जणांचा मृत्यू; १३ तासानंतर बाहेर...

0
सोलापूर | Solapur सोलापूर शहरातील (Solapur City) अक्क्लकोट रोड एमआयडीसी परिसरातील (MIDC Area) सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला आज (रविवारी) सकाळी भीषण आग लागल्याची घटना...