नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची ९ तळे उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे पाकिस्तानने बिथरून भारत आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला चढवला होता. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत युद्धबंदीची घोषणा केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर येथील हवाई तळावर जात भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविले. त्यानंतर आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जाऊन भारतीय जवानांचे तोंडभरून कोतूक केले. यानंतर त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.
यावेळी बोलतांना सिंह म्हणाले की, “पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी (Terrorist) धर्म विचारुन निरपराधांना मारले. यानंतर तुम्ही जे उत्तर दिले, ते जगाने बघितले. भारतीयांना तुम्ही धर्म विचारुन मारलत, तर आम्ही तुम्हाला तुमचे कर्म पाहून मारले. त्यांनी धर्म पाहून निरपराधांचा बळी घेतला. आम्ही पाकिस्तानच कर्म पाहून त्यांचा खात्मा केला. हा आमचा भारतीय धर्म आहे”, असे त्यांनी म्हटले. तसेच “एक संरक्षण मंत्री म्हणून मला तुम्हाला खूप जवळून समजण्याची संधी मिळाली. पहलगामच्या घटनेनंतर तुमच्या मनात राग होता. संपूर्ण देशात क्रोध होता. तुम्ही तुमच्या रागाला योग्य दिशा देऊन पहलगामचा बदला घेतला”, असेही त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तान (Pakistan) आज अशा स्थितीत आहे, ते जिथे उभे राहतात, तिथून मागणाऱ्यांची लाईन सुरु होते. आज ते आयएमएफ (IMF) कडून कर्ज घेत आहेत. आज भारत त्या देशांच्या श्रेणीमध्ये येतो, जे आयएमएफला पैसा देतात, जेणेकरुन गरीब देशांना कर्ज मिळेल. भारताबद्दल (India) सगळ्यांना माहित आहे. भारत शांततेला प्राधान्य देणारा देश आहे. पण जेव्हा देशाच्या संप्रभुतेवर आक्रमण होते, तेव्हा उत्तर देणे गरजेचे आहे”, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले.
तसेच “भारताची दहशतवादाविरोधात किती कठोर प्रतिज्ञा आहे, हे सगळ्या जगाने पाहिले आहे. आम्ही त्यांच्या न्यूक्लियर ब्लॅकमेलची पर्वा केली नाही. पाकिस्तानने अनेकदा अणवस्त्र वापरण्याच्या धमक्या दिल्या. आज मी श्रीनगरच्या भूमीवरुन सगळ्या जगाला प्रश्न विचारतो, अशा बेजबाबदार, चुकीच्या देशाच्या हातात अणवस्त्र सुरक्षित आहेत का? पाकिस्तानची अणवस्त्र आयएईएच्या आपल्या देखरेखीखाली घ्यावी” अशी मोठी मागणीही यावेळी मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केली.