Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रीय हातमाग दिन विशेष : वाढीव उत्पादन खर्चामुळे हातमाग व्यावसायिकांची कसरत

राष्ट्रीय हातमाग दिन विशेष : वाढीव उत्पादन खर्चामुळे हातमाग व्यावसायिकांची कसरत

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

पैठणी म्हणजे येवल्याची आणि येवला म्हणजे पैठणी. असे समीकरण झाले आहे. गेल्या पाचशे वर्षांपासून ही परंंपरा कायम आहे. देशासह परदेशातही पैठणी महिलांच्या मनावर राज्य करत आहे. येथील विणकरांनी उत्कृष्ट पैठणी निर्मितीसाठी पाच राष्ट्रपतीसह राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवलीे. मात्र, आज रेशीमसाठी बंगलोरला व जरीसाठी सुरतची पायपीट करावी लागत आहे. वाढीव उत्पादन खर्चामुळे कसरत करावी लागत आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळीने स्वदेशी उद्योगांना विशेषतः हातमाग विणकरांना आधार दिला होता. या चळवळीचे स्मरण म्हणून, दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस, ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2015 साली केंद्र सरकारने घेतला. पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे करण्यात आले होते. देशातल्या हातमाग विणकर समुदायांप्रती सन्मान व्यक्त करणे, त्यांच्या कलेचा गौरव आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात या क्षेत्राने दिलेल्या योगदानाची यथोचित दखल घेण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने येवल्याच्या पैठणी उद्योगाचा आढावा घेत असताना वरील चित्र समोर आले आहे.

हातमाग कलेतल्या भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्याचा आणि हातमाग विणकर तसेच कामगारांना अधिक अधिकृत ओळख असलेला जीआय देखील येथील पैठणीला मिळाला. पण शासनाने जाहीर केलेल्या 2023 ते 2028 या पंचवार्षीक वस्त्रोद्योग धोरणात येवल्याची पैठणीच बेपत्ता झाली आहे.

मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचे प्रा. के. आर. उदमले यांनी येवल्याच्या पैठणीवर सखोल संशोधन केले आहे. 1660 पासूनचे येवल्याचे सदर्भ त्यांनी दाखवून दिले आहे. सतराशे सालापासून येथे पैठणीचे उत्पादन सुरु झाले. सहा हजार पैठणी उत्पादकांपैकी आता निम्मेच राहीले आहेत. 90टक्के उद्योग खासगी आहे. जर व रेशमासाठी बंंगलोर, सुरतला जावे लागत असल्याने उत्पादन खर्च वाढला अहे.

2100 रुपयांपासून 10 हजारापर्यंत व 20 हजारांपासून 2 लाखांपर्यंंतची पैठणी मिळत असली तरी सर्वाधिक उलाढाल ही 2100 ते 10 हजारांच्या पैठणीचीच होत आहे. तीन हजार कामगारांना येथे कायमस्वरुपी रोजगार मिळाला असला तरी त्यांंचे दरडोई उत्पन्न मात्र फारसे वाढलेले नाही. अशी त्यांची खंत आहे. विणकर दिनाच्या निमित्ताने त्यांच्या समस्या दूर होवोत. पैैठणी उद्योगाला राजाश्रय प्राप्त होवो, हीच येवलेकरांंची इच्छा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या