Wednesday, September 30, 2026
Homeमुख्य बातम्याPlane Crash : पुन्हा मोठी दुर्घटना; हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळलं, एकाचा...

Plane Crash : पुन्हा मोठी दुर्घटना; हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळलं, एकाचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

बांगलादेशची (Bangladesh) राजधानी ढाकामध्ये (Dhaka) हवाई दलाचे F-7 BGI विमान शाळेवर (School) कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. विमान कोसळल्याने मोठा स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीमुळे लोकांची एकच धावाधाव झाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान ढाका येथील उत्तर भागातील माईलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या आवारात कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती तेथील अग्निशमन यंत्रणेकडून देण्यात आली आहे. तर चार जण जखमी झाल्याचे समजते.

दरम्यान, ढाका शहरातील एका कॉलेज कॅम्पसमध्ये हे विमान कोसळले (Plane Crash) आहे. बांगलादेश हवाई दलाचे हे ट्रेनिंग एअरक्राफ्ट असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

India Alliance Meeting : मोठी बातमी! निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार;...

0
नवी दिल्ली | New Delhi 'विशेष सखोल पुनरावलोकन' (SIR) प्रक्रियेचा मुद्दा आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाईची मागणीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार)...