Friday, June 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUS-Israel and Iran War : इस्रायल-अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने युद्ध पेटलं; कोणता...

US-Israel and Iran War : इस्रायल-अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने युद्ध पेटलं; कोणता देश पावरफुल? कुणाकडे किती सैन्य?

नवी दिल्ली | New Delhi

इस्रायल आणि अमेरिकेने (US-Israel Attack) संयुक्त लष्करी कारवाई करताना इराणची (Iran) राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला आहे. भारतीय वेळेनुसार आज (दि. २८ फेब्रुवारी) रोजी सकाळी तेहरानसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि हवाई हल्ल्याचे सायरन वाजले.

- Advertisement -

तेहरानमध्ये आतापर्यंत ज्या ठिकाणी हल्ला झाला त्यात गुप्तचर मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, सर्वोच्च नेते खमेनी यांचे कार्यालय आणि इराणी अणुऊर्जा संघटना यांचा समावेश आहे. दुसरीकडे इराणने इस्रायलवर प्रत्युत्तरात्मक हल्लेही सुरू करत सुमारे ४०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्याचा परिणाम भारतासह (India) संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, इराणवरील या हल्ल्याने भारतीय शेअर बाजारावरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, काही बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांवर इराणची काय प्रतिक्रिया येते आणि तणाव किती काळ टिकतो, यावरच पुढील दिशा अवलंबून असेल.

कच्च्या तेलाच्या किमती वाढणार

इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक भडकल्यास, पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन, त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. सध्या कच्च्या तेलाची किंमत साधारणपणे ६७ डॉलर प्रति बॅरल एवढी आहे. यात आधीच २ टक्क्यांची वाढ झाली आहे. जर हा संघर्ष अधिक चिघळला, तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो.

कोणत्या क्षेत्राला बसणार फटका?

कच्चे तेल महाग झाल्यास देशात महागाई वाढण्याचा धोका आहे. याचा सर्वाधिक फटका ऑईल मार्केटिंग कंपन्यांना बसणार असल्याचे बोलले जाते. जर किमतीत मोठी वाढ झाली तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते. याशिवाय, कच्च्या तेलावर अवलंबून असणारे पेंट उद्योग, विमान वाहतूक (एव्हिएशन) आणि टायर उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावर आणि शेअर्सवरही वाईट परिणाम दिसून येऊ शकतो. तसेच, येणाऱ्या काही आठवड्यांत बाजारात मोठी अस्थिरता आणि चढ-उतार पाहायला मिळतील, असाही अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

इराण-इस्रायलपैकी कोण पावरफुल?

इराण आणि इस्रायलच्या सैन्याची तुलना करायची झाल्यास एका रिपोर्टनुसार इस्रायलपेक्षा इराणकडे सैन्यबळ अधिक आहे. इराणकडे सध्या परिस्थितीमध्ये सहा लाख सक्रिय सैनिक आहेत, तर ३.५ लाख राखीव सैनिक आहेत. इस्रायलकडे अवघे १.७ लाख सक्रिय सैनिक आहेत, तर ४.५ लाख राखीव सौनिक आहेत. या राखीव सौनिकांना विशेष प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे वेळ पडल्यास हे सैनिक इस्रायल कोणत्याही युद्धात वापरू शकतो.

हवाई दलाकडे फायटर जेट

इस्रायलकडे ६०० पेक्षा अधिक अत्याधुनिक फायटर जेट आहेत. ज्यामध्ये एफ-३५ सारख्या विमानांचा समावेश आहे. या विमानांचे वैशिष्ट्य म्हणजे हे विमानं रडारला हुलकावणी देण्यास सक्षम आहे. दुसरीकडे इराणकडे देखील ५०० पेक्षा जास्त लढाऊ विमान आहेत. मात्र त्यांची विमान ही जुनी असून, या पातळीवर इस्रायल इराणपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे.पंरतु, इराणची सर्वात मोठी ताकद ही त्यांच्या लांब पल्ल्याच्या मिसाईल असून, या मिसाईलची दहशत इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुद्धा आहे.

ताज्या बातम्या

टेलिग्रामला

Telegram: दिल्ली उच्च न्यायालयाचा टेलिग्रामला झटका; २२ जून पर्यंत बंदी कायम

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiनीट परीक्षेपर्यंत बंदी घातलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामला दिल्ली उच्च न्यायालयाचा आणखी एक झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने २२...