Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजElection Commission : "राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान, आम्ही कुठल्याही पक्षासाठी..."; निवडणूक आयोगाचे...

Election Commission : “राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान, आम्ही कुठल्याही पक्षासाठी…”; निवडणूक आयोगाचे आरोपांवर स्पष्टीकरण

नवी दिल्ली | New Delhi

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर (Election Commission) ‘मतचोरी’चा आरोप केला होता. त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर आज (रविवारी) निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

निवडणूक आयोगाचे अध्यक्ष म्हणाले की, “कायद्यानुसार निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक पक्षाचा जन्म होतो. निवडणूक आयोगासाठी सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष हे सारखेच आहेत. कोणताही पक्ष जवळचा किंवा दुरचा नाही. अनेकदा वेगवेगळे आरोप होतात, त्यामध्ये सत्यता नाही”, असे ज्ञानेश कुमार यांनी म्हटले.

YouTube video player

ते पुढे म्हणाले की, “गेल्या दोन दशकांपासून सर्व राजकीय पक्षांनी (Political Party) मतदार यादीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. याच कारणास्तव एसआयआर (SIR) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही राज्याच्या मतदार यादीत कोणत्याही मतदाराचे नाव गहाळ होऊ नये, याचा आम्ही प्रयत्न करत आहे. कोणतेही अवैध किंवा अपात्र नाव यादीत राहू नये, असा आमचा प्रयत्न”, असल्याचेही कुमार यांनी सांगितले.

तसेच “कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीबाबत (Voter List) काही आक्षेप असल्यास तो संबंधित राज्याच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे आपला आक्षेप नोंदवू शकतो. जर त्यांना (राहुल गांधी) त्यांच्या आरोपांमध्ये सत्यता वाटत असेल, तर ते संबंधित राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे शपथपत्रासह आपली तक्रार नोंदवू शकतात. त्यावर कारवाई केली जाईल”, असेही ज्ञानेश कुमार यांनी म्हटले.

कुमार पुढे म्हणाले की, “१८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मतदार यादीत नाव नोंदवावे आणि मतदान अवश्य करावे. बिहारमधील मतदान यादीत सुधारणा करण्यासाठी सर्वांकडून योगदान मिळत आहे. जुलैमध्ये १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनीही मतदाता बनण्यासाठी अर्ज केले आहेत. मतदान यादीत सुधारणेसाठी अजून १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वांना यात सुधारणा करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहनही यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले.

ज्ञानेश कुमार (Dyanesh Kumar) यांनी पुढे म्हटले की, “एसआयआरच्या नावाखाली गैरसमज पसरवले जात आहेत. सर्व राजकीय पक्षांचे बीएलओ ज्या मतदार यादीचे सत्यापन करतात, त्याच यादीवर राष्ट्रीय स्तरावरील नेते प्रश्न उपस्थित करतात. कदाचित स्थानिक बीएलओंची माहिती त्या नेत्यांपर्यंत पोहोचत नसावी. अशा परिस्थितीत मत चोरीसारख्या शब्दांचा वापर करून संविधानाचा अपमान केला जात आहे. मतदारांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले जात आहे, असा टोलाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी (Chief Election Commissioner) राहुल गांधी यांना लगावला.

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ जानेवारी २०२६ – नवा वाचनतोडगा

0
वाचनसंस्कृती रुजवण्याची गरज नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे तिची आठवण पुन्हा...